पश्चिम महाराष्ट्र

पेठवडगावमध्ये अपघातात भादोले येथील भाऊ - बहीण ठार

विवेक दिंडे

पेठवडगाव - येथे विजयसिंह यादव चौकात आज दुपारी एकच्या सुमारास मालवाहू ट्रक व मोटारसायकल यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये एक मुलगा व मुलगी ठार झाले. शुक्राणा मोहसीन शेख (१२), आरफान मोहसीन शेख (१०, दोघे रा. भादोले) अशी मृतांची नावे आहेत.

सुदैवाने या अपघातामध्ये त्यांचे आई वडील बचावले आहेत. वडील मोहसिन हारुण शेख (३५,) व त्यांची पत्नी रिजवाना (३०) हे जखमी अाहेत. त्यांच्यावर वडगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मोहसिन शेख यांचे भादाेले येथे हॉटेल आहे. ते कामानिमित्त वडगावला त्यांच्या मोटारसायकलवरुन (एम.एच.०९,सी.क्यू ५३०९) पत्नी, दोन मुलांच्यासह आले होते. ते विजयसिंह यादव चौकातून लाटवडेच्या दिशेने जाणार होते. मेन चौकात मालवाहु ट्रक ( एम.एच.०९, सी. ए ३१२४) हातकणंगलेहून बिरदेवचौकातून वळण घेऊन जात होता. यावेळी मोटारसायकलची धडक झाली व मोटारसायकलवरील चौघे ट्रकखाली सापडले. यामध्ये मुलगा आरफान यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी मुलगी रिजवाना उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. वडिलांच्या छातीला, हाताला तर त्यांच्या पत्नीच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलेला अाहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT