two dead in accident at ugar khurd belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वे पुलावरून ट्रक कोसळून दोन जण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

उगार खुर्द (जि. बेळगाव)- येथील रेल्वेरूळावर असलेल्या पुलास ट्रकने जोराने धडक दिल्याने ट्रक खाली कोसळला. या अपघातात ट्रकमधील चालक व क्‍लिनर दोघेही जागीच ठार झाले. हा भीषण अपघात बुधवारी (ता. 22) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. चालक मेहबुबबाशा मुल्ला (वय 28, रा. वगलापूर, ता. रामदूर्ग) व क्‍लिनर मुताप्पा जनाप्पा कुरी (वय 20, रा. हळदूर) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे रेल्वेची एका मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, जयगडहून जिप्सम घेऊन निघालेला ट्रक (केए 29 बी 5344) मिरज, कागवाडकडून मंगसुळी, उगार खुर्दमार्गे जे. के. फॅक्‍टरी-मुद्दापूर (जि. बागलकोट) येथे जात होता. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास उगार खुर्द येथील रेल्वेमार्गावर असलेल्या पुलावर हा ट्रक आला. यावेळी पुलाच्या पश्‍चिम बाजूकडील संरक्षक भिंतीस जोराची धडक दिली. या धडकेत ट्रक भिंत तोडून खाली कोसळला. त्यामुळे ट्रकमधील चालक मेहबुबबाशा मुल्ला व क्‍लिनर मुताप्पा जनाप्पा कुरी हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या पुलाखालून रेल्वेचे दोन मार्ग आहेत. यापैकी एका मार्गावर ट्रक कोसळला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद झाला होता. दोन्ही मार्गावर ट्रक पडला असता तर उगार खुर्दमार्गे रेल्वेची वाहतूक काहीकाळ बंद झाली असती. मात्र एक मार्ग खुला असल्याने बेळगाव-मिरज दरम्यान रेल्वे वाहतूक एका मार्गावरून सुरु होती. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रेल्वे खात्याचे पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील दोन्ही मृतदेह बाहेर काढून उगार खुर्द येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 

भीषण अपघाताचीच सर्वत्र चर्चा 
रेल्वे पुलावरून ट्रक कोसळून दोघे जागीच ठार झाल्याची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे अनेकांनी गर्दी केली होती. यावेळचे भीषण दृश्‍य पाहून सर्वत्र अपघाताचीच चर्चा सुरू होती. सोशल मीडियामुळे छायाचित्रांसह घटनेची माहिती सर्वत्र पोहोचली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT