Bapuso Talekar and Suresh Talekar Sakal
पश्चिम महाराष्ट्र

कागल : अज्ञात वाहनाच्या धडकेत केनवडे येथील चुलते -पुतणे जागीच ठार

कागल - निढोरी राज्यमार्गावर व्हन्नूर( ता. कागल) येथे फाट्यावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात चुलता - पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

कागल - निढोरी राज्यमार्गावर व्हन्नूर( ता. कागल) येथे फाट्यावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात चुलता - पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.

कागल - कागल - निढोरी राज्यमार्गावर व्हन्नूर( ता. कागल) येथे फाट्यावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला (Motorcycle) ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) चुलता - पुतण्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. शनिवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे. बापुसो यशवंत तळेकर (वय ४७) आणि त्यांचा पुतण्या सुरेश दिनकर तळेकर वय (२८) (दोघे केनवडे, कागल) अशी त्यांची नावे आहेत.

केनवडे (ता . कागल) येथील बापुसो यशवंत तळेकर (वय ४७) आणि त्यांचा पुतण्या सुरेश दिनकर तळेकर वय (वय २८) हे दोघेजण हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यात कामाला होते. पहाटे सव्वाचार वाजता ड्युटी संपवून दोघेजण मोटरसायकल (क्र. एम एच ०९ सीवाय ७३५९) वरून आपल्या गावी चालले होते. पहाटे पावणे पाच वाजता व्हन्नूर या फाट्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरात ढोकरले. त्यामुळे झालेल्या अपघातात तेलवेकर चुलते -पुतणे यांचा जागीच मृत्यू झाला. या रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी या अपघाताची माहिती कागल पोलिस ठाण्याला कळवली.

पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्‍चे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्‍चे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT