Rajendra Birajdar and Daryappa Birajdar sakal
पश्चिम महाराष्ट्र

Jat Accident : टायर फुटताच मोटार झाडावर आदळून दोघे ठार

जत-विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटरवरील हवालदार वस्तीजवळ टायर फुटताच भरधाव मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार.

सकाळ वृत्तसेवा

जत - जत-विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटरवरील हवालदार वस्तीजवळ टायर फुटताच भरधाव मोटार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. राजेंद्र आनंदराय बिराजदार (वय ३५, उटगी), दऱ्याप्पा संगप्पा बिराजदार (३४, जाडर बोबलाद) अशी मृतांची नावे आहेत.

संजय हनुमंत कोळगिरी (उटगी) गंभीर असून, त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ९) रात्री अकराच्या सुमारास घडली. याची जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. उटगी येथील हे तिघेही काल रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी मोटारीमधून (एमएच ०४ जीसी २१२१) निघाले होते.

जत-नागज मार्गे त्यांची मोटार भरधाव जात असतानाच टायर फुटल्याने ती झाडावर आदळली. यात दोघे जागीच ठार झाले. रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडेबाराच्या आसपास एका वाहनधारकाला दिसली. त्याने जत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत तिघांनाही बाहेर काढले. यात दोघे जागीच ठार झाले होते. रात्री उशिरा घटनास्थळी पंचनामा करून पहाटे दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणले होते. यातील मृत राजेंद्र यांचे उटगी येथे कृषी दुकान आहे, तर अन्य दोघे शेती करतात. या घटनेने उटगी व जाडरबोबलाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची जत पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT