पश्चिम महाराष्ट्र

सांगली : खानापूर तालुक्यात विज अंगावर पडून दोन शेतमजूर ठार

सकाळ वृत्तसेवा

विटा - घाडगेवाडी ( ता. खानापूर ) येथे अंगावर विज पडल्याने दोन शेतमजूर जागीच ठार झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. सिध्दराम भिमराव जगदाळकर ( वय २७, रा. सुरगाई, ता. सिंदगी, जि. विजापूर ) व मल्लू ( वय २५, पुर्ण नांव समजू शकले नाही) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जगदाळकर हा महादेव कृष्णा घाडगे यांच्याकडे तर मल्लू हा अकुंश बापू घाडगे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होते. आज सकाळी हे दोघे म्हसोबाच्या डोंगरावर जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसास सुरवात झाली. त्यामुळे हे दोघे एका झाडाखाली आसऱ्यासाठी थांबले होते. पण या दोघांच्या अंगावर विज पडला. यात या दोघांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

गावकामगार तलाठी व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी कुर्ली व घाडगेवाडी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मल्लू हा आठवड्यापुर्वी मजूरीसाठी आला होता. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT