इस्लामपूर (सांगली)- कडकनाथ कोंबडी पालन योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील सुत्रधार सुधीर शंकर मोहिते याचे फरार साथीदार रोहीत मोहन पुराणिक (वय 43, रा. गोखलेनगर पुणे) व सुधीर सुभाष कापरे (वय 43, रा. धनकवडी) या दोघांना सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 15 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश श्री. मुनघाटे यांनी दिला.
कडकनाथ कोंबडी पालन योजनेतील कोट्यावधीच्या अपहार प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात 31 ऑगस्ट 2019 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तानाजी निवृत्ती कदम (वय 56, रा. पेठ) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घोटाळ्यातील मुख्य संशयित सुधीर मोहिते तब्बल दोन महिने फरारी होता. जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पोलिस उपाधिक्षक संदीपसिंह गील या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या शाखेकडे तब्बल 1300 हुन अधिक जणांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे फसवणूकीचा आकडा सुमारे 15 कोटीपर्यंत आहे.
रयत ऍग्रो इंडिया व महारयत ऍग्रो इंडिया या दोन कंपन्यांच्या माध्यमातून सुधीर मोहिते याने कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरु केला होता. 75 हजार रुपये गुंतवणूक करुन वर्षभरात दोन लाखाहुन अधिक रकमेचा फायदा देण्याचे अमिष दाखवण्यात आले होते. मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सुधीर मोहिते व त्याच्या टोळक्याने महाराष्ट्रासह परराज्यातील शेतकऱ्यांना फसवले आहे. मुख्य सुत्रधार सुधीर मोहिते याच्यासह त्याचे साथीदार संदीप मोहिते, गणेश शेवाळे, हणमंत जगदाळे यांना पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. अन्य संशयित विजय ज्ञानदेव शेंडे, मृगेश जयवंत कदम, रोहित पुराणिक, सुधीर कापरे (सर्व रा. पुणे) हे फरारी होते. त्यापैकी रोहित पुराणिक व सुधीर कापरे यांना काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पुणे येथून जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 15 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.