Two gawas killed in train collision near Gunji 
पश्चिम महाराष्ट्र

गुंजीजवळ रेल्वेच्या धडकेत दोन गवे ठार....

सकाळवृत्तसेवा

खानापूर (बेऴगाव) - रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच गुंजीदरम्यान दोन गव्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुंजी-लोंढा लोहमार्गादरम्यान कुर्मतवाडी येथे घडली आहे. एकाचवेळी दोन गवे ठार झाल्याने वनखात्यात खळबळ माजली आहे.

याबाबत वनाधिकाऱ्यांकडून समजलेली अधिक माहिती अशी, रात्री उशिरा लोहमार्ग ओलांडतांना मालवाहू रेल्वेंने या दोन गव्याने धडक दिली. यातील एक नर तर दुसरी मादी असून दोन्हींचे वय 5 ते 6 दरम्यान आहे. आज ही घटना उघडकीस आल्यानंतर लोंढा वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत गौराणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या गंभीर घटनेची माहिती जिल्हा वनाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर विभागीय वनसंरक्षाणाधिकारी करूणाकरण, जिल्हा वनाधिकारी अमरनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

मृत गव्यांची पाहणी करून पंचनामा केल्यानंतर गुंजीतील जंगलात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात  आले. लॉकडाऊननंतर रेल्वेच्या धडकेत घडलेली ही पहिलीच घटना असल्याने वनखात्याने ही घटना गांभिर्याने घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Crisis : मुंबईवर अभूतपूर्व पाणी संकट ! जलाशयांत केवळ १० टक्के पाणीसाठा; बांधकाम, जलतरणचा पाणीपुरवठा आजपासून बंद

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

PM Kisan 23rd Installment: 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 2,000 रुपये कधी खात्यात येणार? थेट कृषिमंत्र्यांनीच सांगितली तारीख

SC Reservation Subclassification : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत एक लाखांहून अधिक हरकती, सरकार घाईगडबडीत निर्णय घेणार नाही; मंत्री शिरसाट यांची ग्वाही

Satara Accident: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे स्वप्न अधुरे! बनपुरीजवळ दुचाकी-पिकअपची समोरासमोर धडक; १६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT