Two girls drowned in water 
पश्चिम महाराष्ट्र

बहिणीला नेण्यासाठी आलेल्या काळाला पाहताच तिने उडी मारली पण..

सकाळ वृत्तसेवा

अकोले : तालुक्‍यातील पाडाळणे येथील खैरेवाडा बंधाऱ्यात बुडून आज दुपारी दोन मुलींचा मृत्यू झाला. एका मुलीला वाचविण्यात यश आले असून, तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


याबाबत समजलेली माहिती अशी ः कोमल भिका अस्वले (वय 15) आणि सुवर्णा रामनाथ शेंगाळ (वय 13) व शुभांगी रामनाथ शेंगाळ (वय 15) आज दुपारी शाळा सुटल्यानंतर शेळ्या चारण्यासाठी पाडाळणे शिवारात ओढ्यावर बांधलेला खैरेओढा बंधारा परिसरात गेल्या होत्या.

त्या वेळी कोमल व सुवर्णा बंधाऱ्यात बुडाल्याचे शुभांगीने पाहिले. बहिणीला वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. ही माहिती गावात कळाल्यावर तरुणांनी धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाण्याबाहेर काढून येथील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

बहिणीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतलेली शुभांगी हिची प्रकृती नाजूक असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तरीय तपासणी करून कोमल व सुवर्णा यांचे मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT