Two hundred kilometers of footpath to reach the village 
पश्चिम महाराष्ट्र

गाव गाठण्यासाठी मजुरांची दोनशे किलोमीटरची पायपीट

सकाळ वृत्तसेवा

 अकोले : रोजगाराच्या शोधात चाकण, आंबेगाव, जुन्नर, नारायणगाव येथे स्थलांतरित झालेले तालुक्‍यातील सुमारे पाच हजार कामगार, मजूर गावाकडे परतले आहेत; मात्र "लॉक डाउन'मुळे वाहतूक बंद झाल्याने या सर्वांना डोंगरदऱ्या तुडवीत उन्हातान्हात पायीच प्रवास करावा लागला. मात्र, पुणे जिल्ह्यातून आलेल्या या लोकांमुळे आरोग्ययंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

संबंधितांची नावे गोळा करण्याचे काम ग्रामसेवक, आशा सेविका, तलाठी, पोलिस पाटील करीत आहेत. 
इगतपुरी तालुक्‍यातील आंबेवाडी परिसरातील काही आदिवासी मजूर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने गावाकडे परतले; मात्र जवळ पैसे नसल्याने त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जात पायपीट करावी लागत आहे.

आदिवासी मजूर दर वर्षी पावसाळा संपला की पुणे जिल्ह्यात नारायणगाव, जुन्नर भागात मजुरीसाठी जातात. कोरोनाचा फटका त्यांनाही बसला. सरकारने जिल्हा हद्द बंद केल्याने, तसेच खासगी वाहनेही बंद झाल्याने हे मजूर 200 किलोमीटर पायपीट करीत आपल्या आंबेवाडी गावात पोचले.

या प्रवासात त्यांना जेवण न मिळाल्याने त्यांनी ही व्यथा रस्त्यात भेटलेल्या जामगावच्या ग्रामस्थांना सांगितली. तेथील लोकांनी माणुसकीच्या भावनेतून त्यांना जेवण दिले; मात्र "तुम्ही गावात येऊ नका; तुम्हाला बाहेर जेवण देतो. कोरोनामुळे बाहेरगावच्या व्यक्तींना आम्ही गावात येऊ देत नाही,' असे सांगत त्यांना गावाबाहेर जेवण देऊन त्यांच्या गावी पाठविले. काही मजूर मोटरसायकलवर तिघे-तिघे बसून, तर काही जण टेम्पोला प्रत्येकी 300 रुपये देऊन गावी आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT