Almatti Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam च्या तब्बल 26 दरवाजांतून दोन लाख 25 हजार क्युसेक विसर्ग सुरू; पुराचा धोका टाळण्यासाठी निर्णय

आलमट्टी जलाशयातून (Almatti Dam) २६ दरवाजांतून तब्बल दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील धरण (Dam in Maharashtra) क्षेत्रासह कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागात पावसाचा जोर वाढला आहे.

चिक्कोडी : आलमट्टी जलाशयातून (Almatti Dam) २६ दरवाजांतून तब्बल दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. महाराष्ट्रातील धरण (Dam in Maharashtra) क्षेत्रासह कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागात पावसाचा जोर वाढल्याने व महाराष्ट्रातील काही धरणांतून विसर्ग करण्यात येणार असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आलमट्टीत दोन लाख क्युसेक आवक सुरू आहे.

मंगळवारी सकाळी दीड लाख क्युसेक असलेला विसर्ग रात्री ९.३० वाजता एक लाख ७० हजार इतका करण्यात आला होता. पण, पाऊस संततधार राहिल्याने व नद्यांतून पाणी अधिक वाहून आल्याने बुधवारी सकाळी ९.३० वाजता हा विसर्ग दोन लाख क्युसेक इतका केला गेला. बुधवारी पावसाचा जोर वाढत गेल्याने व कोल्हापूर जिल्ह्यातील काही धरणांतून विसर्ग करावा लागणार असल्याने महाराष्ट्राच्या सूचनेनुसार आणखी विसर्ग करण्याची विनंती करण्यात आली.

त्यानुसार बुधवारी (ता. २४) संध्याकाळी सात वाजता तब्बल दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. गतवर्षीही टप्प्याटप्प्याने हा विसर्ग सव्वा दोन लाखांपर्यंत गेला होता. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वाधिक विसर्ग आहे. सध्या चिक्कोडी विभागात नद्यांतून येणारे पाणी पावणे दोन लाख क्युसेकपर्यंत असल्याने पाणी संथगतीने वाढत आहे. आलमट्टीच्या विसर्गामुळे यंदा पुराचा मोठा फटका बसलेला नाही. ज्याप्रमाणात पाणी वाहून येत आहे त्याचा विचार केल्यास सध्या चिक्कोडी विभागाला मोठ्या पुराचा फटका बसला असता. सध्या आलमट्टी व महाराष्ट्राच्या समन्वयातून पुराचा फटका बसलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT