The administration will decide the rate of essential things.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा तालुक्‍यात आणखी दोघांना "कोरोना'

सकाळवृत्तसेवा

 इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कासेगाव आणि कामेरी या गावचे हे दोघे रुग्ण आहेत. हे दोघेही कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आहेत. इस्लामपूर शहर सोडून आता वाळवा तालुक्‍यातील गावांमध्ये रुग्णांना लागण झाल्याने धास्ती निर्माण झाली आहे. 

आज दुपारी या दोघांना लागण झाल्याचे समजताच तालुका आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ ही गावे सील करत रुग्णांशी संबंधित लोकांना क्वारंटाईन केले. कामेरी व कासेगाव या गावातील जवळपास 35 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ते ज्या परिसरात राहतात त्या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सात जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे, त्यापैकीच हे दोघे आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. 

कालच (ता. ) शिराळा तालुक्‍यातील निगडी येथील एका युवतीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच इस्लामपूर प्रशासनाने तीन दिवसांचा कडेकोट लॉकडाऊन पुकारला आहे. त्यातच आज या 2 नावांची भर पडल्याने खळबळ माजली आहे. कारण या दोन्ही गावांशी इस्लामपूर शहराचा सातत्याने संपर्क येतो. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT