shiv bhojan thali 
पश्चिम महाराष्ट्र

शिवभोजन थाळीसाठी  नव्याने दोन प्रस्ताव 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः राज्य शासनाने 26 जानेवारीपासून सुरु केलेल्या शिवभोजन थाळी योजनेची लज्जत वाढत चालली आहे. सांगली शहरातील तिन्ही केंद्रावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिन्ही केंद्रावर प्रतिदिन 150 थाळांची खप होतोय.

मार्केट यार्ड येथील व्यवहार रविवारी बंद असल्याने या केंद्रावर रविवारी नोंदणी कमी होते. प्रतिसाद पाहून तिन्ही ठिकाणी आणखी जादा 50 थाळा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. मिरज शहरात नव्याने दोन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा व पुढील टप्प्यात प्रत्येक तालुक्‍याला केंद्र सुरु करण्याचा महाविकास आघाडीचे नियोजन आहे. 


राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील तीन ठिकाणी शिवभोजन थाळी योजनेची सोय केलेली आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने 10 रुपयांत शिवभोजन ही गरीब व गरजूंसाठी स्वस्त दरात प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू केली आहे.

योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सांगली शहराची व्याप्ती लक्षात घेवून सांगली बसस्थानक, बाजार समिती, वसंतदादा पाटील रुग्णालय आवारात अशी तीन ठिकाणी योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नियुक्त भोजनालयांमार्फत प्रतिदिन 150 थाळ्या शासकीय अनुदानप्राप्त भोजनालयातून द्यायच्या याचे उद्दिष्ट पार होत आहे. 
 

" शिवभोजन थाळी योजनेला सांगली शहरात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 50 थाळा आणि मिरज शहरात दोन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.' 
-वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT