पश्चिम महाराष्ट्र

कडकनाथ कोंबडी फसवणूक  प्रकरणी "फूड बर्ड'च्या दोघांना अटक

सकाळवृत्तसेवा

सांगली : फलटण (जि. सातारा) येथील फूड बर्ड ऍग्रो प्रायव्हेट कंपनीच्या कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. संजय भगवान मोरे (वय39, रा. दौलतनगर, सातारा) आणि जॉन्सन ख्रिस्तोफर रायचुर (वय 33, कोरेगाव, जिल्हा सातारा) अशी त्या दोघांची नावे आहेत.

यापूर्वी कंपनीचे संचालक राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे (दोघे रा. सरडे, ता. फलटण, सातारा) आणि सचिन तुकाराम करे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली नाही, त्यांनी कागदपत्रांसह तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

अधिक माहिती अशी, की कंपनीच्या एका युनिटमध्ये 75 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास कंपनी 220 कडकनाथ कोंबड्या व दहा महिन्यांचे कोंबडी खाद्य, औषध व भांडी देणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. सभासदांकडून एका वर्षात कडकनाथ कोबडीची एकूण 8500 अंडी 2 लाख 38 हजार रुपयांना कंपनीतर्फे खरेदी करु तसेच एका वर्षात दोन लाख 38 हजारांचा फायदाही गुंतवणूकदारास होईल, असे आमिष दाखवण्यात आले.

सांगलीतील गुंतवणूकदारास फलटण येथे जाण्यास त्रास होतो, म्हणून सांगलीतील शंभरफुटी रस्ता परिसरात कंपनीने कार्यालय उघडले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले होते. त्याची रक्‍कम 1 कोटी 54 लाख 66 हजार रुपये इतकी होती. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार कंपनीचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. 

तीन दिवस पोलिस कोठडी 
अटक केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तिघांनाही न्यायालयात हजर केले असता 1 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT