पश्चिम महाराष्ट्र

दोन प्रकल्प अहवालांचे सादरीकरण

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घर २०२२ अंतर्गत पहिल्या दोन प्रकल्प अहवालांचे सादरीकरण छत्रपती ताराराणी सभागृहात पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर केले. राज्यात कोल्हापूर व नागपूर ही दोनच शहरे प्रधानमंत्री आवास योजना अंमलबजावणीमध्ये अग्रेसर असल्याचे सांगून, महाराष्ट्रामध्ये कृती आराखडा सादर करणारी कोल्हापूर महानगरपालिका पहिली असल्याचे नमूद करण्यात आले. 

आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शहराचा सर्वांसाठी घरे कृती आराखडा बनवून शासनास सादर करणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी हा आराखडा तयार झाला आहे. सर्व पदाधिकारी व सदस्य यांना तो पूर्ण माहीत असणे आवश्‍यक आहे.’’ 

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी प्रकल्प अहवालाची माहिती दिली. एकूण १९० झोपडीधारकांना पक्की घरे उपलब्ध होतील, तसेच ३७६ शहरी गरीब नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध होतील. त्यापैकी २८२ घरे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

सल्लागार संस्था व्ही.आर.पी. असोसिएशनच्या अध्यक्षा मेघा गवारे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यामध्ये शहरातील झोपडपट्ट्या आणि त्याव्यतिरिक्त शहरात असणारा बेघर या दोन्ही घटकांची पक्‍क्‍या घरांची गरज, योजनेच्या माध्यमातून चार घटकांमधून मिळणारी पक्की घरे, आवश्‍यक निधी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राची भागीदारी, २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने योजनेची अंमलबजावणी आदी बाबींची माहिती दिली. 

दोन प्रकल्प अहवालांपैकी एक प्रकल्प अहवाल झोपडपट्टीचा आहे. यामध्ये बोंद्रेनगर व कदमवाडी झोपडपट्टीचा समावेश आहे. 

दुसऱ्या प्रकल्प अहवालामध्ये कामगार चाळ व कदमवाडी येथे परवडणाऱ्या दरातील घरांची निर्मिती करणे याचा समावेश आहे. 

नगरसेवक संतोष गायकवाड, विजयसिंह खाडे-पाटील, कविता माने यांच्या प्रश्‍नांना मेघा गवारे यांनी उत्तरे दिली.   या वेळी महापौर हसीना फरास, उपमहापौर अर्जुन माने, महिला बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर, परिवहन समिती सभापती नियाज खान, अफजल पिरजादे, नगरसेवक अशोक जाधव, कमलाकर भोपळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, माजी नगरसेवक आदिल फरास, सल्लागार कंपनीचे युवराज जबडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT