Two suspected patients with sari in the Sangali municipal area 
पश्चिम महाराष्ट्र

इथेही आढळले 'सारी'चे दोन संशयित रुग्ण\

सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रात सर्व्हे करण्यात येत असताना "सारी' आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना पुढील तपासणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिली.

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. तसेच मोबाईल फिवर क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहेत. याद्वारे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये तापाचे 58 तर आयएलआय रुग्णांची संख्या 87 आढळून आली आहे. इतर आजार असललेल्या रुग्णांची संख्या 846 इतकी आहे. दरम्यान सारीच्या रुग्णांचे स्वॅब घेण्यासाठी त्यांना मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. 

महापालिका क्षेत्रात ताप, सर्दी, खोकला, श्‍वसनाचा त्रास या आजारांची तपासणी करण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी बारा ठिकाणी फिवर क्‍लिनिक सुरू केले. तसेच सांगलीत दोन आणि मिरजेत दोन फिरत्या दवाखान्यांची सोय केली आहे. ताप, सर्दी, खोकला, श्वसन, अंगदुखीसह लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी या फिवर क्‍लिनीकमध्ये उपचार घ्यावेत, असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले होते. 

फिवर क्‍लिनीकला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दवाखान्यात सारी आणि आयएलएल या आजारांची लक्षणेही तपासण्यात येणार आहेत. तशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची माहिती शासकीय रुग्णालयास कळवून त्यांना पुढील उपचारासाठी तेथे पाठवण्यात येणार आहे. 

दरम्यान, महापालिका क्षेत्रात सारी या आजाराची लक्षणे असलेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे "स्वॅब' तपासण्यासाठी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी सांगितले.

ते म्हणाले,""फिवर क्‍लिनीकसह फिरत्या दवाखान्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत विविध आजारांचे 993 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये तापाच्या रुग्णांची संख्या 58 इतकी आहे. आयएलआय आजाराची लक्षणे असलेले 87 तर अंगदुखी व अन्य आजारांचे 846 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर आवश्‍यक उपचार करण्यात आले आहेत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT