two wheeler issue sangli district 
पश्चिम महाराष्ट्र

दुचाकी विक्रीसाठी शोरुमधारकांचा "हा' नवा फंडा

सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्ह्यात तब्बल एक हजारहून अधिक बीएस-फोर दुचाकी वाहनांची खरेदी त्याच कंपनीच्या शोरुम मालकांनी केली आहे. त्याची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंद झाली आहे. नोंदणी क्रमांक निश्‍चित झाला आहे. त्यांची विक्री करण्यात 30 मार्च 2020 नंतर बंदी होती. मात्र त्याआधीच कागदोपत्री विक्री करार पूर्ण झाल्याने आता सामान्य ग्राहकांना सेकंड ओनर म्हणून ही वाहने खरेदी करता येतील. ही वाहने अत्याधुनिक प्रणालीच्या बीएस-6 वाहनांच्या तुलनेत सरासरी 10 हजारांनी स्वस्त आहेत.

त्यामुळे हा फंडा जिल्ह्यातील ग्राहकांचे सुमारे एक कोटी रुपये वाचवणार आहे. 
मार्चअखेरपर्यंत कार्यान्वित बीएस-फोर या प्रणालीच्या वाहनांमुळे प्रदुषण अधिक होत असल्याने ती बंद करून बीएस-6 ही अत्याधुनिक प्रणालीची वाहने बाजारात आणण्यात आली. मार्च 2020 नंतर बीएस-4 या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी होणार नाही, हे निश्‍चित झाले. साहजिकच, हिरो, होंडा, बजाज, यामाहा, टीव्हीएससह सर्वच कंपन्यांनी उत्पादित केलेल्या शंभर टक्के वाहनांची या काळात विक्री झाली नाही. हजारो दुचाकी शोरुममध्येच राहिल्या. त्या भंगारात घालणे अशक्‍यच होते. त्यावर तोडगा काढताना कंपन्यांनी शक्कल लढवली.

सरकारशी समन्वयानेच हा फंडा अंमलात आला. त्यानुसार, देशभरात काही लाख दुचाकी वाहने सदर कंपन्याच्या शोरुम मालकांनी स्वतःच्या नावे खरेदी करून ठेवली. त्यामुळे सर्वच्या सर्व वाहनांची विक्री कायद्यानुसार निश्‍चित झालेल्या मुदतीत झाली. 
आता बीएस-6 प्रणालीची वाहने बाजारात आली आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण अत्यल्प आहे, मात्र आता व्यवहार सुरु झालेत. जिल्ह्याच्या शोरुममध्ये सुमारे एक हजाराहून अधिक बीएस-4 या प्रकारची वाहने आहेत. त्यांच्या विक्रीचे व्यवहारही सुरु करण्यात आलेत. तांत्रिकदृष्ट्या या वाहनांची खरेदी करताना आता सामान्य ग्राहकांची नोंद "सेकंड ओनर' म्हणून होईल. पहिला मालक म्हणून कंपनी शोरुम चालकांची नोंद असेल. त्याला ग्राहकांनी संमती दर्शवली आहे. कारण, बीएस-6 या प्रकारच्या वाहनांच्या तुलनेत ही वाहने तब्बल 10 हजार रुपयांनी अधिक स्वस्त आहेत. 

बाजार बहरेल 

कोरोना संकट काळात सोशल डिस्टन्स पाळावाच लागणार आहे. त्यामुळे प्रवास करताना लोक सार्वजनिक वाहतूक वाहनांचा वापर कमी करतील. त्याचा फायदा दुचाकी बाजाराला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुचाकी खरेदीला वेग येईल, असा अंदाज आहे. 

""लॉकडाऊननंतर दुचाकीची खरेदी सुरु झाली आहे. अर्थातच बीएस-6 पेक्षा बीएस-4 दुचाकींच्या किंमती सरासरी 10 हजार रुपये कमी आहेत. त्यामुळे सध्या तरी 10 पैकी 9 लोक तीच खरेदी करताना दिसत आहेत. जोवर आमच्याकडे ही वाहने आहेत तोवर व्यवहार चालतील.'' 

-श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक हिरो, मिरज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT