पश्चिम महाराष्ट्र

मैत्रिणीला फिरवण्यास बनले दुचाकी चोर

सकाळवृत्तसेवा

सांगली - मैत्रिणीला फिरवण्यासाठी आणि चैनीसाठी दुचाकी चोरी महाविद्यालयीन दोघा युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. साहिल मौला पटेल (वय २१, मायाक्का मंदिरजवळ, ढालगाव, कवठेमहांकाळ) व दगडू रामा कुकडे (वय १९, मूळ गाव, मंगळवेढा, सध्या हिवरे, जत) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून साह लाख रुपयांच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांची त्यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले. ढालगाव येथे साहिल व दगडू संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पथकास मिळाली. दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक दुचाकी मिळाली. तिच्या नंबर प्लेटवर खाडाखोड  केल्याने सखोल चौकशी करण्यात आली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

पोलिसी खाक्‍या दाखवताच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आठ महिन्यांत त्यांनी १२ दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. त्या दुचाकी त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना दहा-पंधरा हजारांत विकल्याचे समोर आले. कागदपत्रे पुन्हा देण्याच्या अटीवर हा व्यवहार केला जात होता. त्यांच्याकडून सहा लाखांच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. साहिल ढालगावात राहतो. महाविद्यालयात शिकत आहे. त्यांच्या मैत्रिणीला फिरवण्यासाठी व चैनीसाठी तो दुचाकी चोरी करीत असल्याची कबुली  त्याने दिली. 

सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, राजू कदम, विजय पुजारी, युवराज पाटील, मारुती साळुंखे, विनोद च्वाहण, सुनील चौधरी, सतीश आलदर, जितेंद्र जाधव, अरुण सोकटे यांचा कारवाईत सहभाग होता. 

लॉक नसल्याने चोरी 
साहिल पटेल आणि दगडू कुकडे यांनी हॅंडल लॉक नसलेल्या दुचाकी चोरी केल्या. वायर तोडून सर्किटला जोडल्यानंतर दुचाकी सुरू होते. ही पद्धत त्यांनी वापरली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT