The two-wheeler in Vita took the police for a walk; Type between unmasked action 
पश्चिम महाराष्ट्र

विट्यात दुचाकीस्वाराने पोलिसाला नेले फरफटत; विनामास्क कारवाई दरम्यानचा प्रकार

दिलीप कोळी

विटा (जि. सांगली) : येथील पोलिस कर्मचारी विटा- मायणी रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत असताना एका दुचाकी चालकाने व त्याच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाने पोलिसाला शंभर मीटर फरफटत नेल्याचा प्रकार आज दुपारी बाराच्या सुमारास घडला.

यामध्ये पोलिस नाईक नंदकुमार भगवान मदने (वय 40) जखमी झाले. याप्रकरणी दुचाकी चालक शुभम राजू भागवत (वय 23, विवेकानंद नगर, विटा) व प्रतीक दुर्योधन बिसूरकर (वय 19, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा) यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत मदने यांनी वरील दोघांविरुद्ध विटा पोलिसात फिर्याद दिली. 


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने विनामास्क दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर विटा पोलिस ठाण्यातील पोलिस श्री. मदने व अन्य पोलिस कर्मचारी विटा- मायणी रस्त्यावर आज कारवाई करत होते. यादरम्यान शिवाजी चौकाकडून मायणी रस्त्याकडे एका (एम एच 10 सी सी 0597) दुचाकीवरून दोन तरुण विनामास्क येताना पोलिसांना दिसले. त्यावेळी त्यांना दुचाकी थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला.

मात्र त्यांनी दुचाकी थांबविल्यासारखी केली व मदने यांच्या अंगावर दुचाकी चालकाने दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. दुचाकी शुभम भागवत चालवत होता. तर त्याच्या पाठीमागे प्रतीक बिसूरकर बसला होता. बिसूरकर याने मदने यांचा उजवा हात धरून दुचाकी बरोबर शंभर मीटर फरफटत नेले. पुढे वाहतूक कोंडी झाल्याने बिसूरकर याने मदने यांना सोडून दिले. तोपर्यंत मदने यांच्याबरोबर असणारे अन्य पोलिस कर्मचारी तेथे पोहोचले.

दुचाकी चालक भागवत यास दुचाकीसह ताब्यात घेतले. तर त्यांच्या पाठीमागे बसलेला बिसूरकर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. मदने यांना फरफटत नेल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय विटा येथे उपचार करण्यात आले.  

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT