two young men of manrajuri were killed in a truck collision sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत भरधाव ट्रकच्या धडकेत मणेराजुरीचे दोघे तरूण ठार... 

सकाळ वृत्तसेवा

सांगली : संचारबंदीच्या कळात येथील बुधगाव-सांगली रस्त्यावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत मणेराजुरी (ता. तासगाव) येथील दोघे तरूण जागीच ठार झाले. बजरंग शामराव शिंदे (वय 29) व प्रकाश हणमासो शिंदे (वय 40) अशी त्या दोघांची नावे आहेत. दुपारी दोनच्या सुमारास बुधगाव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की

बजरंग शिंदे व प्रकाश शिंदे हे दोघे मणेराजुरी (ता. मिरज) येथे राहण्यास आहेत. दुपारी एकच्या सुमारास दुचाकी (एमएच 10 बीके 7710) वरून सांगलीकडे येत होते. त्यावेळी येथील बुधगाव कॉलेजवळ दुपारी दोनच्या सुमारास आले. त्यावेळी त्यांच्या शेजारी चारचाकी (एमएच 10 एएन 1438) निघाली होती. त्यावेळी मागून ट्रक (एमएच 10 झेड 2933) भरधाव वेगाने येत होती. बुधगाव कॉलेजजवळ आल्यानंतर ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दोघेही रस्त्यावर आदळले.

बुधगावमध्ये अपघात; मागून दिली धडक 

दोघेही जागीच ठार झाले.दरम्यान, घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेतली. उपनिरीक्षक विष्णू माळी, सहायक फौजदार पी. जी. वंजारी, पोलिस नाईक एस. यु. जाधव यांनी पंचनामा केला. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दारम्यान, संशयित ट्रक चालकासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे. 
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT