पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे थांबले की त्यांना थांबवले?

उमेश घोंगडे

पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पार्टीतील प्रवेश वारंवार लांबणीवर पडतोय. आजदेखील पुण्यात होणारी बैठक रद्द करून उदयनराजे मुंबईला रवाना झाले. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेश लांबण्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्यास विरोध केल्याने उदयनराजांनी थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाने आणखी दोन दिवस थांबण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. 

उदयनराजेंचा भाजपा प्रवेश हा गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यावरून विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. राजांनी भाजपात जाऊ नये, यासाठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या मनधरणी केली. मात्र, त्याला फारसे यश आलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर उदयनराजेंनी आज पुण्यात काही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली.उदयनराजांची तब्बेत बरी नसल्याचे सांगण्यात आले तसेच ते मुंबईला रवाना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकीटावर पुन्हा पोट निवडणुकीला सामोरे जाण्यात काही कार्यकर्त्यांना "रिस्क' वाटत असल्याने हे कायेकर्ते राजीनामा देऊन भाजपात जाण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे उदयनराजे संभ्रमात असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुतांश कार्यकर्त्यांना मात्र राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्यात कोणतीच अडचण वाटत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हा गट राजीनामा नेऊन भाजपात जाण्याचा आग्रह करीत आहेत.

उदयनराजे, शिवेंद्रराजे व रामराजे नाईक-निंबाळकर एकाचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. या काळात रामराजे व उययनराजे तसेच शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्यात मतभेद होते. या हे सर्वजण भाजपात आल्यानंतर तिथेही मतभेद होणार नाहीत, याची खात्री कोण देणार असा विचार करणारा एक गट भाजपातही आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या प्रवेशाचे काय होणार याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्‍यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT