Udayan Raje talks about forts in Maharashtra
Udayan Raje talks about forts in Maharashtra  
पश्चिम महाराष्ट्र

गड-किल्ल्यांवर डान्स बार करायला परवानगी द्या, असं मी कसं म्हणेन?

सकाळ वृत्तसेवा

वाई : गड-किल्ल्यांचे सुशोभीकरण आवश्‍यक आहे. मात्र, त्या ठिकाणी हॉटेल, परमीट रूमला माझा विरोध कायम आहे. गड-किल्ल्यांकडे शिवमंदिर म्हणून पाहा. या गड-किल्ल्यांमुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते. अन्य कोणताही हेतू त्यामध्ये ठेवणे हा वेडेपणा ठरेल, असे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

गड-किल्ल्यांबाबत महाराष्ट्रातील समाजाच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या भावना आहेत. किल्ल्यांमुळे स्वराज्याची संकल्पना साकार होऊ शकते, इतिहास जिवंत राहतो. गड-किल्ल्यांचा विकास झाला पाहिजे, त्याचे पुनरुज्जीविकरण, डागडुजी झाली पाहिजे. परदेशामध्ये ज्याप्रमाणे या ऐतिहासिक वास्तूंची व गड किल्ल्यांची जाहिरात केली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. अशाच पद्धतीने या गड-किल्ल्यांचा विकास व जाहिरात व्हायला हवी; परंतु त्याचे जे पवित्र आहे हे कायम राखणे गरजेचे असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

या गड-किल्ल्यांवर डान्स बार करण्याला परवानगी द्यायला हवी, असे मी कसे म्हणेन. असे मी बोललोच नाही. असं होणार असेल तर तो वेडेपणाच आहे. मी जे बोललो नाही, त्याचे खापर माझ्यावर का फोडतात, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

निवडणुकीच्या शेवटच्या काळात नसलेले मुद्दे उपस्थित केले जातात आणि असलेले मुद्दे अडगळीत जातात. मी कोणाला घाबरत नाही; परंतु नको असलेल्या विषयांवर मी नको ती चर्चा करणार नाही, केली तर मला कधीही, कोणीही, कुठेही विचारू शकतो. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी मात्र ठाम आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका 
मागील निवडणुकीत मी जर पृथ्वीराज चव्हाणांना मदत केली नसती तर ते निवडूनच आले नसते, असा दावा उदयनराजेंनी केला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व मुख्यमंत्री असताना त्यांनी साताऱ्याचा, पश्‍चिम महाराष्ट्राचा व राज्याचा कोणताही विकास केला नाही. त्यांच्याकडे कोणतीही दृष्टी नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील यांनी फार मोठ्या पदावर काम केले आहे. त्यांचा मी आदर करतो; परंतु त्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. श्रीनिवास पाटील हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यामुळे मी त्यांना प्रतिस्पर्धी मानतच नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT