पश्चिम महाराष्ट्र

दाढी वाढवून अक्कल वाढत नाही - उदयनराजे

सकाळवृत्तसेवा

सातारा - मंगळवार तळ्यातील विसर्जनाला बंदी माझ्या पत्रामुळे नाही तर, सभागृहाची परवानगी न घेता तुमच्या दोन ‘चमको’ नगरसेवकांनी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करायला भाग पाडल्याने झाली आहे. आमच्यावर केलेल्या आरोपांतून आमदारांचा बालिशपणा व अज्ञान उघड झाले आहे. केवळ दाढी वाढवून अक्कल वाढत नाही, अशी खरमरीत टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे व प्रशासनात मंगळवार तळ्यात गणेश विसर्जन करण्यावरून वाद सुरू आहे. त्यामध्ये काल (ता. १६) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंवर टीका केली. त्याचा उदयनराजेंनी आज पत्रक काढून समाचार घेतला. पत्रकात म्हटले आहे की, ‘‘बऱ्याच वर्षांपासून होत असलेल्या विसर्जनामुळे व स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यातच तळ्यावरच्या तुमच्या लाडक्‍या ‘चेतक’ने पत्राची मागणी केल्याने आम्ही ते पत्र दिले होते. सात सप्टेंबरला मी दिलेल्या पत्रातही पूर्वीच्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्यामुळे माझी भूमिका दुटप्पी नसल्याचे स्पष्ट होते. दाढी वाढवली म्हणजे अक्कल वाढत नाही, त्यासाठी आडात असावे लागते.’’

माफी मागण्यास तयार, तुम्ही नाक घासणार का?
आम्ही नेहमी एका कुटुंबाप्रमाणे जनतेसोबत आहे. सहकाराच्या नावाखाली संस्था काढून कोणाला देशोधडीला लावले नाही. आम्ही माफी मागून जर, मंगळवार तळ्यात विसर्जनाला परवानगी मिळणार असेल तर आम्ही त्याला तयार आहे. मात्र, तुमच्या बॅंका व संस्थांमधील भ्रष्टाचाराने अनेकांचे संसार उघड्यावर आले, त्याबाबत तुम्ही नाक घासणार का? असा सवालही उदयनराजे यांनी केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT