Shivendraraje-and-Ramraje
Shivendraraje-and-Ramraje 
पश्चिम महाराष्ट्र

रामराजे, शिवेंद्रराजे गटांचा उदयनराजेंना विरोधच

सकाळवृत्तसेवा

सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबतची भूमिका पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यापुढे मांडली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि रामराजे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या विरोधात भूमिका मांडली, तर उदयनराजेंची ताकद लक्षात घेऊन त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशीही मागणी काही पदाधिकाऱ्यांनी केली. खासदार उदयनराजे बैठक संपल्यावर पोचले, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे बैठकीस अनुपस्थित होते.

लोकसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, रमेश धायगुडे, दत्तानाना ढमाळ, अविनाश कदम, शशिकांत पिसाळ, विजय नायकवडी आदी उपस्थित होते.

दुपारी साडेबाराच्या दरम्यान बैठकीस सुरवात झाली. यावेळी प्रमुख चारच पदाधिकाऱ्यांना भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. साताऱ्यातील तीन राजे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांचा सध्या वाद सुरू असून हा वाद कधी मिटवायचा तेव्हा मिटू देत. पण, या सर्वांना बाजूला ठेऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा वसंतराव मानकुमरे यांनी मांडली. रमेश धायगुडे, दत्तानाना ढमाळ यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. खासदार उदयनराजेंची सातारा मतदारसंघात असलेली ताकद लक्षात घेता गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना मिळालेले लीड पक्षाने लक्षात घ्यावे. तसेच सर्वसामान्यांशी त्यांची असलेली नाळ आणि मतदारसंघातील लोकांची इच्छा लक्षात घेऊन पक्षाने उदयनराजेंनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी वाईचे विजय नायकवडी यांनी केली.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अविनाश कदम यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध करत स्थानिक पातळीवर आमची कुचंबणा होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ""उदयनराजेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपबरोबर राहून काम केले. तरीही जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार 35 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले. याचा विचार पक्षाने करावा व सर्वसमावेशक उमेदवार द्यावा. आम्हाला विश्‍वासात घेतल्याशिवाय पक्षाने निर्णय घेऊ नये. अविनाश कदम यांच्या भूमिकेला जयेंद्र चव्हाण, राजू भोसले यांनी पाठिंबा दिला. शिवेंद्रसिंहराजे भोसले बैठकीस उपस्थित नसल्याने आम्हाला स्वतंत्र वेळ द्यावा, अशी मागणी माजी सभापती राजू भोसले यांनी केली.

माढ्यातून प्रभाकर देशमुख इच्छुक
माढा मतदारसंघाच्या बैठकीत माण-फलटणमधून विजयसिंह मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक- निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मागील वेळी कॉंग्रेसने मदत केली नसल्याचा मुद्दा मांडला. प्रभाकर देशमुख यांनी ते स्वत: इच्छुक असल्याचे सांगून पक्षाने संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यास माणमधील काही पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT