मंगळवेढा 
पश्चिम महाराष्ट्र

उजनीच्या बॅक वॉटरचे पाणी मंगळवेढ्यास मिळणार ? 

हुकुम मुलाणी

मंगळवेढा - उजनी जलाशयातील खाजगी क्षेत्रातील बंद व वापरात नसलेले 2.33 टीएमसी पाणी कमी करून ते पाणी मंगळवेढा उपसा सिंचन योजना व सिना माढा सह सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनेसाठी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केल्यामुळे दुष्काळी  तालुक्याला भविष्यात पाणी मिळण्याच्या आशा निर्माण  झाल्या आहेत. 

दरम्यान हे पाणी सोलापूर जिल्ह्याला देवू नये यासाठी इंदापूर तालुक्यात पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

उजनी जलाशयाची निर्मिती होताना त्या प्रकल्पासाठी जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांना मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या. पण दुष्काळी मंगळवेढ्याच्या वाटेला आवश्यक असणारे पाणी मात्र मिळत नाही. कालव्याची अर्धवट कामे यामुळे पाणी कमी मिळत आहे.

यासाठी दुष्काळी 35 गावाला पाणी मिळावे या भागातील जनतेनी बहिष्कार आंदोलन केले. उजनी जलाशयाची साठवण क्षमता 117.23 टीएमसी इतकी असून, यातील उपयुक्त पाणीसाठा 53. 66 इतका असून मृत पाणी साठा 63.66 टी.एम.सी इतका आहे.

सध्या धरणातील पाणी 9.6 टी.एमसी खासगी क्षेत्रासाठी राखीव आहे. विद्युत पंपाद्वारे सुमारे 34 हजार हेक्‍टरपेक्षा जास् क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्ताविक लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी ०.९० टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले होते.

मात्र, यातील ०.३३ टीएमसी पाणी कमी करुन, शेतकऱ्यांच्या हक्काचे शेतीचे बॅक वॉटरचे राखीव १.९७ टीएमसी पाणी करुन मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी १.०१ टीएमसी व सिना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी ४.५० ऐवजी ४.७५ टीएमसी पाणी व सोलापूरच्या औद्योगिक वापरासाठी २.१५ टीएमसीऐवजी ३.२६ टीएमसी पाणी देण्याचा प्रस्तावाला तांत्रिक मंजूरी देण्यात आली आहे. 

शासनाकडे तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मंजुरीसाठी ३ ऑगस्ट २०१८ च्या पत्राद्वारे पाठविण्यात आला.

प्रशासनाने इंदापूरला राखीव ठेवलेले पाणी अन्य जिल्हाला देण्याचा डाव आखला आहे या विरोधात आंदोलन करू असा इशारा पुणे जि. प. बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिला.

उजनी वर तात्पुरत्या परवानगी असलेले व बंद योजनाचे पाणी कमी करण्याचा प्रस्ताव आहे हे पाणी प्रवाही क्षेत्रासाठी वापरण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवलेला आहे. जीवन शिंदे अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ सोलापूर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT