श्रीरामलु  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्याचा विकास करणार

स्वयंचलित वाहन प्रशिक्षण परीक्षा ट्रॅकच्या कोनशिला समारभांप्रसंगी मार्गदर्शन करताना समाज कल्याण मंत्री श्रीरामलु बोलत होते

संजय कांबळे

खडकलाट ः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्याचा विकास करणार आहोत. येत्या काळामध्ये सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून राज्याला विकासाच्या वळणावर नेऊ. संपकाळात निलंबित केलेल्या कर्मचाऱय़ांना सामावून घेण्यास येईल. बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यांना नव्या बसेस लवकरच देऊ, असे आश्वासन राज्याचे परिवहन व समाज कल्याण मंत्री श्रीरामलु यांनी दिले. शनिवारी (ता. २५) नवलिहाळ (ता. चिक्कोडी) येथे कर्नाटक राज्य वायव्य परिवहन महामंडळातर्फे ९ कोटी खर्चुन तयार होणाऱ्या स्वयंचलित वाहन प्रशिक्षण परीक्षा ट्रॅकच्या कोनशिला समारभांप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी होते.

मंत्री श्रीरामलु, आमदार गणेश हुक्केरी, बेळगाव जिल्हा परिवहन संचालक एम्. शोभा यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण झाले. मंत्री श्रीरामलु म्हणाले, पाच एकरात हा ट्रॅक होत आहे. संगणकीकृत व स्वयंचलित यंत्रणेमुळे वाहन चालविण्याचा परवाना देताना कोणतीही चुक होणार नाही. त्यामुळे भविष्यकाळात यांचा फायदा होऊन अपघाताचे प्रमाण अत्यल्प होणार आहे. आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, ट्रकअभावी याआधी अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, रायबागमधील हुबळीला जावे लागत. या सेवेमुळे चांगली सोय होणार असून काम त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे.

प्रादेशिक परिवहनच्या बेळगाव जिल्हा संचालिका एम्. शोभा यांनी स्वागत केले. कार्यक्रमास प्रादेशिक परिवहनचे हुब्बळी येथील कार्यकारी अभियंता एच्. एम्. नागराजमुर्ती, चिक्कोडीचे जे. पी. विशाल, नवलिहाळ ग्रा. पं. चे उपाध्यक्ष जयापगोळ, खडकलाट ग्रा. पं. उपाध्यक्ष कुमार पाटील, विजय पाटील, वासु गावडे यांच्यासह बेळगाव, चिक्कोडी प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी व नागरिक उपस्थित होते. बसनाळगड्डे सरकारी हायस्कूलचे शिक्षक अलगोंडा सोलापूर यांनी सूत्रसंचालन केले‌. परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT