crime.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

दुर्दैवी...पोटच्या मुलीचा अमानुष छळ करून बापाने केला खून 

सकाळवृत्तसेवा

वाळवा : पोटच्या मुलीचा अमानुष छळ करून बापाने तिचा खून केल्याची घटना आज येथे उघडकीस आली. तेरा वर्षांच्या या मुलीला अत्यंत यातना देण्यात आल्या. काल रात्रभर तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच फरशीवर आपटून तिचा खून करण्यात आला. सुहाना खॉजासाहेब मोमीन (वय 13) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सुहानाचा वडील खॉजासाहेब इस्माईल मोमीन (वय 38), सावत्र आई आसमा खॉजासाहेब मोमीन (वय 26 रा. श्रमीकनगर वसाहत हुतात्मा चौकाजवळ वाळवा) या दोघांना आष्टा पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. 

अधिक माहिती अशी, की श्रमीकनगर वसाहतीतील खॉजासाहेब मोमीन याच्या पहिल्या पत्नीचे तीन वर्षापुर्वी निधन झाले आहे. तिची सुहाना मुलगी होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महिन्याभरात खॉजाने आसमाबरोबर विवाह केला. तिला लहान मुलगा आहे. सुहानावर खॉजा सतत अत्याचार करत होता. तिला सातत्याने बेदम मारहाण केली जायची. लहान सुहानाला भंगार गोळा करायला लावायचा. घरकामासाठी सक्ती करायचा. सुहानाला मारहाण होत असताना शेजारच्या लोकांनी विरोध केला तर माझी मुलगी आहे. मी काहीही करेन असे म्हणायचा. 

निरागस सुहानाला पै पाहुणे चार दिवस घेऊन गेले तर तिथे भांडण करून सुहानाला तो घरकामासाठी घेऊन यायचा. सुहानाला अन्नपाणीही दिले जात नव्हते. काल रात्रभर सुहानाला खॉजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत तिचा चेहरा सुजला होता. नाकावर मारहाणीच्या जखमा होत्या. खुनाची घटना सकाळी उघडकीस आली. त्यानंतर वसाहतीतील लोक खॉजाच्या घराजवळ गोळा झाले. महिलांसह सर्वानी त्याला बेदम चोप दिला. या घटनेला जबाबदार असणारी सुहानाची सावत्र आई आसमा सुहानाच्या मृतदेहाजवळ बसली होती. 

नऊच्या सुमारास आष्ट्याचे पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे, उपनिरीक्षक समीर ढोरे यांच्या सह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आष्टा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. समाजाने पुढाकार घेऊन सुहानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT