पश्चिम महाराष्ट्र

"या' तालुक्‍यात झाले अप्पर तहसील

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : जागेची अडचण असतानाही चांगल्या पद्धतीने मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू केले आहे. या तहसील कार्यालयातून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्‍न सुटतील अशी अपेक्षा आहेत. अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून हे कार्यालय राज्यात आदर्शवत करण्याचे आवाहन माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केले. 

मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे नूतन अप्पर तहसील कार्यालयाचे उद्‌घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते रविवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार अमोल कुंभार, सभापती सोनाली कडते, मंद्रूपचे नायब तहसीलदार उज्ज्वला सोरटे, अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड, मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे, उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, सदस्य महादेव कमळे, शशिकांत दुपारगुडे, शालिनी चव्हाण, हणमंत कुलकर्णी, रावजी कापसे, हणमंत पुजारी, संगप्पा केरके, भीमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, गौरीशंकर मेंडगुदले, दीपाली व्हनमाने, माजी सरपंच विश्‍वनाथ हिरेमठ, विभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रूपचे पोलिस उपनिरीक्षक संदीप धांडे उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, अप्पर तहसील कार्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आता सोलापुरात जावे लागणार नाही. येथेच त्यांची कामे पूर्ण होतील. जिल्ह्याचे व तालुक्‍याचे कार्यालय बदल करण्यासाठी खूपच अडचणी येतात. तरीही माजी सहकारमंत्री देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे आज हे शक्‍य झाले आहे. 

खासदार डॉ. महास्वामी म्हणाले, आमदार देशमुखांच्या तालुक्‍यातील प्रत्येक कामाकडे राज्याचे लक्ष आहे. त्यांनी तालुक्‍यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मंद्रूप येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न केले. तालुक्‍यातील प्रत्येक प्रश्‍नांकडे देशमुख यांचे लक्ष असून ते सोडवण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपाठपुरावा करतात. देशमुख यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्त्व तालुक्‍याला लाभले हे भाग्याचे आहे. 
प्रास्ताविक प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT