Use App To Get Railway General Ticket Sangli Marathi News  
पश्चिम महाराष्ट्र

रेल्वेचे जनरल तिकीटही काढणे झाले सोपे; त्यासाठी 'हे' करा

शंकर भोसले

मिरज ( सांगली )  - रेल्वेची परिपूर्ण माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाकडून नवनवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये रेल्वेच्या वेळापत्रकापासून ते स्थानकात येणाऱ्या गाड्यांची रनिंग स्थिती पाहणे, घर बसल्या ऑनलाईन तिकीट मोबाईल ॲपद्वारे आरक्षित करणे या सर्वच सुविधांचा लाभ रेल्वेकडून वेगवेगळ्या ॲपद्वारे  दिला जात आहे.

तशीच सेवा रेल्वेच्या नव्या यूटीएस ॲपमुळे प्रवाशांना रांगेत पॅसेंजर गाड्यांच्या तिकिटांसाठी ताटकळत थांबावे लागणार नाही कारण यूटीएस या मोबाईल ॲपद्वारे साधे (अनारक्षित) तिकीट काढता येणार आहे. यामध्ये जनरल तिकीट, प्लॅट फॉर्म तिकीट काढणे या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र यासाठी प्रवाशांना मोबाईलच्या प्लेस्टोअर्स मध्ये जाऊन यूटीएस हे अप डाऊन लोड करावे लागणार आहे.

कसे कराल ॲप डाऊन लोड

मोबाईलच्या प्लेस्टोअर्समध्ये जाऊन यूटीएस ॲप डाऊन लोड करून वापर कर्त्यांनी पहिल्यांदा साईन अप करणे गरजेचे आहे. यावेळी तिकीट काढण्यासाठी आर वॉलेट, पेटीएम, मोबीक्विक या पैकी एकाचा वापर करू शकता. आर वॉलेटचे रिचार्ज तिकीट कॉऊंटरवरून किंवा ऑनलाईन करू शकता. मात्र कमीत कमी शंभर रुपयांचे रिचार्ज आर वॉलेटमध्ये करणे अनिवार्य आहे.

या यूटीएस ॲपमुळे काय होईल

यामुळे रेल्वे स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा एक्‍सप्रेस गाडीने प्रवास  करताना लागणारे साधे (अनारक्षित) तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. शिवाय रेल्वे स्थानकावर तिकिटासाठी लवकर येणे टाळता येईल. यामुळे वेळेची नक्कीच बचत होईल.

तिकीट कसे काढाल

रेल्वे स्थानक परिसराच्या तीस मीटर परिसरामध्ये आपणास तिकीट काढता येणार नाही, मात्र रेल्वे स्थानकापासून तीस मीटर ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत आपण तिकीट खरेदी करू शकता. यामुळे तुम्हांला जरी घरातून निघण्यास वेळ झाला आणि रेल्वेची वेळ झालीतर तुम्ही बस, रिक्षामधून  रेल्वे स्थानकाकडे जातानाही यूटीएस ॲपद्वारे रेल्वे तिकीट काढू शकता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT