ahmednagar jilha bank 
पश्चिम महाराष्ट्र

पैसे घ्या, ठराव द्या... जिल्हा बॅंकेसाठी मतदानाची विक्री

संजय आ. काटे

श्रीगोंदे : जिल्हा सहकारी बॅंकेचे संस्था पातळीवरील ठराव करण्याचे काम जोरात सुरू असून, नेत्यांच्या दबावाचा मोठा वापर होत असतानाच, मर्जीतील कार्यकर्त्यांचे ठराव करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी होत असल्याची चर्चा आहे. संचालकांच्या बहुमताने मतदान अधिकाराचा ठराव होणार असल्याने, अनेक भागांतील संचालक मालामाल झाले आहेत. दरम्यान, थकबाकीदार सेवा संस्थांतील संचालक असणारे कारभारी ठरावास अपात्र असल्याने, सभासद असणाऱ्या त्यांच्या "कारभारणीं'च्या नावे ठराव केले जात आहेत. तालुक्‍यात 172पैकी थकबाकीदार नसलेली केवळ एकच संस्था आहे, हे विशेष! 

अंतिम मुदत 30 जानेवारी

जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सेवा संस्थांचा मतदार प्रतिनिधी देण्याचा ठराव करण्याची अंतिम मुदत 30 जानेवारी आहे. तालुक्‍यातील अशा 172पैकी 69 संस्थांचे ठराव सहायक निबंधक कार्यालयाला मंगळवारपर्यंत प्राप्त झाले आहेत. अनेक ठिकाणी ठरावाची तारीख काढली; मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. तालुक्‍यातील केवळ शिवांजली ही एकमेव सेवा संस्था बॅंक पातळीवर थकबाकीत नसल्याने, त्या संस्थेचे संचालक त्यांच्या नावाने ठराव करू शकतात. संस्थेचे अध्यक्ष वैभव पाचपुते यांनी तो ठराव स्वत:कडे घेतला आहे. उर्वरित सगळ्या संस्था थकबाकीदार असल्याने, त्यांच्या संचालकांच्या नावे ठराव होऊ शकत नाहीत. त्यामुळे सभासदांच्या नावे ठराव करावे लागत आहेत. 

संचालकांना मोठी "बिदागी'
सभासदांच्या नावे ठराव करण्यासाठी संचालकांचे बहुमत आवश्‍यक असते. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. ठराव करण्यासाठी संचालकांना मोठी "बिदागी' दिली जात असल्याची खुली चर्चा आहे. काही ठिकाणी फोडाफोडी करून संचालकांना सहलीवर नेले गेले असून, त्यांचा तेथील सगळा "पाहुणचार' इच्छुक सभासदच सांभाळत असल्याचे बोलले जाते. 

30 ठराव महिलांच्या नावे! 
थकबाकीदार संस्थेचे संचालक असणारे गावकारभारी ठराव स्वतःच्या नावे घेऊ शकत नसल्याने, राजकीय शक्कल लढवून, सभासद असलेल्या आपल्या पत्नी अथवा घरातील महिलेच्या नावे ठराव करण्याची खेळी संचालक खेळत आहेत. मंगळवारपर्यंत ज्या 69 संस्थांचे ठराव झाले होते, त्यांत 30 ठराव महिलांच्या नावे झाले असून, बहुतेक ठिकाणी नेत्यांच्या घरांतील व्यक्तीच आहेत. 


तक्रार आल्यास तातडीने दखल घेऊ
सभासदांच्या नावे ठराव करून देणाऱ्या संचालकांपैकी कोणी संचालक थकबाकीदार असेल, तर तोही ठरावासाठी मतदानास अपात्र असतो. तरीही त्याचे मतदान झाले असेल, तर ते वगळून बहुमत दाखवावे लागते. मात्र, अशा संचालकांनी मतदान केलेल्या ठरावांबाबत तक्रार आल्यास तातडीने दखल घेऊ. असे ठराव रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहेत. 
- रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक, श्रीगोंदे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT