Vacant plots in industrial estates should be provided as per demand 
पश्चिम महाराष्ट्र

औद्योगिक वसाहतीत रिकामे भूखंड मागणीप्रमाणे द्यावेत 

विष्णू मोहिते

सांगली : औद्योगिक वसाहतीत जे भुखंड रिकामे आहेत. ज्यावर उद्योगांची उभारणी झाली नाही, असे रिकामे भुखंड उद्योग विभागाच्या मान्यतेने ताब्यात घेऊन, उद्योजकांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिले. 

जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, वसंतदादा पाटील औद्योगिक वसाहतीचे सचिन पाटील, कृष्णा व्हॅलीचे शिवाजी पाटील, रमेश आरवाडे, औद्योगिक वसाहत (विटा) चे अध्यक्ष माणिक पाटील, कुपवाड औद्योगिक वसाहतीचे विनोद पाटील उपस्थित होते. 

डॉ. चौधरी म्हणाले,""औद्यागीक वसाहतीतील समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करण्याची कार्यवाही करावी. ज्यासाठी महापालिकेला अधिकच्या निधीची गरज आहे. त्याचे प्रस्ताव तयार करुन जिल्हा नियोजन समितीला सादर करावेत. विकास कामांना निधी उपलब्ध करुन दिला जाईल. एमआयडीसीत सीईटीपी प्लॅंट सुरू करण्याची तत्काळ कार्यवाही करावी. ईएसआयसीच्या सोयी सुविधा मिळण्यास हॉस्पिटलची प्रलंबित देयके अदा करण्याबाबत कार्यवाही करावी.'' 

एमआयडीसीतील खोक्‍यांचे अतिक्रमण, अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती, प्रदुषण, कचरा संकलन, कुपवाड शहर ते एमआयडीसी हद्दीपर्यंत विद्युत दिव्यांचे खांब व रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण काढण्याबाबत, औद्योगीक वसाहतीतील रस्त्यावर गतीरोधक करणे यावर चर्चा झाली.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT