vaccine depot ready for photoshoot in belgaum youth enjoy for shoot location 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात व्हॅक्‍सिन डेपो बनले फोटोशूट डेस्टिनेशन ; घनदाट झाडीच आकर्षण

सकाळ वृत्तसेवा

टिळकवाडी (बेळगाव) : हिरवाईने नटलेला व्हॅक्‍सिन डेपो सर्वांना साद घालत आहे. शंभर एकर विस्तीर्ण परिसरात पसरलेली झाडी आणि निसर्गरम्य ठिकाण असलेला व्हॅक्‍सिन डेपो सध्या फोटोशूटसाठी प्रसिद्ध ठिकाण बनले आहे. त्यामुळे शहरासह विविध भागातील युवक-युवती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करु लागले आहेत. 

शहरातील टिळकवाडी परिसरात असलेल्या व्हॅक्‍सिन डेपोचा विकास करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी ग्लास हाऊस उभारले आहे. डेपो परिसरात लहान चेकडॅमही बांधले आहेत. तेथे पाण्याचा साठाही होत आहे. तसेच सुमारे शंभर एकरात विस्तारलेल्या या भागात घनदाट झाडी आहे.

व्हॅक्‍सिन डेपोच्या चहूबाजूंनी संरक्षक भिंत असून सध्या हा परिसर तरुणाईला आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी रविवारी व सुट्टीच्या दिवशी व्हॅक्‍सिन डेपोत फोटोशूट करण्यात गुंतले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. त्यावेळी पावसाळ्यात झालेला चिखल व माती व्हॅक्‍सिन डेपोत नेऊन टाकण्यात येत होता. याला काही निसर्गप्रेमींनी आक्षेप घेतल्याने हा प्रकार थांबला होता.

डेपोत वेगवेगळ्या प्रकारची असलेली झाडेही तोडण्याचे प्रकार अद्याप सुरुच आहेत. हिरवाईने नटलेल्या व्हॅक्‍सिन डेपोचे अस्तित्व टिकून राहण्याची गरज आहे. तरुणाईला साद घालणारा व्हॅक्‍सिन डेपोत शॉर्ट फिल्मचे चित्रीकरणही करण्यात येत आहेत. त्यामुळे एकंदरीत व्हॅक्‍सिन डेपो फोटोशूटसाठी प्रसिद्ध बनत चालले आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात झाडी असलेले ठिकाण म्हणून व्हॅक्‍सिन डेपोची ओळख आहे. मात्र या ठिकाणी अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. तसेच काही भागात कचराही पडलेला असतो. याकडे संबधित विभागाने लक्ष देणे आवश्‍यक असून फोटोशूट करताना व्यत्यय येत आहे. फोटोशूटवेळी आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

Vilas Ghule Case : घुले हत्या प्रकरणी खासदारपुत्राला दिलासा, आरोपपत्रातून नाव वगळले

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT