Valava-Chandoli highway will be completed without any hindrance 
पश्चिम महाराष्ट्र

वाळवा- चांदोली राजमार्ग विना अडथळा पूर्ण होणार

विजय लोहार

नेर्ले : वाळवा ते चांदोली दरम्यान होणारा राजमार्ग 158 विना अडथळा पूर्ण होईल आशा दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. ते आज धोत्रेवाडी, कासेगाव, वाटेगाव ता. वाळवा येथे वरील रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठका झाली. त्यावेळी ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील प्रमुख उपस्थित होते. 

मानसिंगराव नाईक म्हणाले,""वाळवा ते नवेखेड, बहे, तांबवे, कासेगाव, वाटेगाव, वाकुर्डे, शेडगेवाडी मार्गे चांदोली असा नव्याने राज्यमार्ग-158 होणार आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आज नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बॅंक यांच्या अर्थसह्यातून होणार आहे. या रस्त्याच्या मार्गावर काही ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. त्यासाठी सार्वजनीक बांधकाम यांच्याकडून संबंधित लोकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. 

लोकांच्या समस्या व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक तांबवे, धोत्रेवाडी, कासेगाव, वाटेगाव येथे जाऊन समस्या जाणून घेतल्या व सूचना केल्या आहेत. विना अडथळा मार्गचे काम पूर्ण व्हावे, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.'' यावेळी वाळवा तालुक्‍याचे माजी सभापती रवींद्र बर्डे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, अशोकराव मोरे, विक्रम जाधव, धोत्रेवाडी माजी सरपंच प्रदीप माने, शंकर जाधव, रामभाऊ माने, कासेगाव सरपंच किरण पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, सुशील लोकरे, भीमराव पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT