Valentine's Day celebrations by doing food donation
Valentine's Day celebrations by doing food donation 
पश्चिम महाराष्ट्र

व्हॅलेंटाईन डे 2019 : अन्नदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा

सुनील नवले

श्रीरामपूर : येथील स्नेहउमंग सामाजिक संस्था व हृदयस्पर्शी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भिक्षुकांना अन्नदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. या उपक्रमातून संस्थेने समाजात वेगळा आदर्श घालून दिला.

14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. तरूण समाजातील गरीब, वंचितांचेही प्रेमी असतात. केवळ आभासी दुनियेवर प्रेम न करता वास्ताविक प्रश्नांवर करून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन स्नेहउमंगचे अध्यक्ष मच्छिंद्र शिंदे, हृदयस्पर्शीचे अध्यक्ष राहूल संत, अवधूत कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे यांनी एकत्र येत प्रेमविरांचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आज येथील रेल्वेस्थानकावर पोलिस उपनिरीक्षक अन्सार शेख, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या प्रा. सुजाता पोखरकर, संतोष मते, व्यंगचित्रकार रवी भागवत, रेल्वे स्टेशन मास्तर सिंग, स्नेहज्योतचे प्रकल्प अधिकारी यशवंत कुरापाटी, मनोज सागर, प्रा. सिमा चव्हान, प्रा. डॉ. सुनील खिलारी यांच्या उपस्थितीत भिक्षुकांना अन्नदान करण्यात आले.
या उपक्रमात सुरज सुर्यवंशी, ओमकार गद्रे, योगेश फुलवर, रामेश्वर पुंडे, सचिन पवार, संचित आदिक, जोएब खान, संकल्प खाटिक, गणेश पटारे, सोनाली उदावंत, ममता रासकर, हर्षदा कोठावळे, धिरज सुर्यवंशी, अंजली वाकचौरे, सुधीर शिंदे, कोमल गायकवाड आदींनी सहभाग घेतला. राजेंद्र सलालकर, आचार्य शुभम महाराज कांडेकर, नंदकुमार उदावंत, प्रा. रवी कवी, श्रीधर कराळे यांनी सहभाग घेतला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT