Valentine's Day is just over three days away  
पश्चिम महाराष्ट्र

आला आला प्रेमाचा दिवस आला...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - जगभरातील प्रेमीयुगुलांचा दिवस असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातही सध्या त्याचे वारे वाहू लागले आहे. प्रेमीयुगुलांकडून हा दिवस साजरा करण्याची तयारी केली जात आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच काही हिंदुत्ववादी संघटना या दिवसाला विरोध करण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यासाठी सोशल मीडियावर जागृती केली जात आहे. याची कल्पना असल्याने प्रेमीयुगुलांनी हा दिवस साजरा करण्याची खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.

प्रेमीजनांचा उत्साह दुणावला

तसे पाहिल्यास व्हॅलेंटाईन वीकला ७ रोजी रोझ डेपासूनच सुरवात झाली आहे. ८ रोजी प्रपोज डे, ९ रोजी चॉकलेट डे, १० रोजी टेडी डे व ११ रोजी प्रॉमीस डे झाले. बुधवारी (ता. १२) किस डे, गुरुवारी (ता. १३) हग डे व शुक्रवारी (ता. १४) व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे. या शेवटच्या दिवसाची प्रेमीयुगुलांना सर्वाधिक प्रतीक्षा असते. हा दिवस अविस्मरणीय ठरावा, यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्याची तयारी व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्यापूर्वीच केली जाते. दरवर्षी या सोहळ्याला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असतो. याची जाणीव असल्याने प्रत्येक प्रेमीयुगुल आपल्या परीने हा दिवस साजरा करण्याची तयारी करत असते. यंदाही त्याची तयारी सुरु झाली असून प्रेमीजनांचा उत्साह दुणावला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांची विरोधात जागृती

दुसरीकडे व्हॅलेंटाईन डे ही आपली संस्कृती नव्हे. त्याऐवजी आपल्या परंपरेला साजेल असा मातृ-पितृ दिन साजरा करा असा आग्रह हिंदुत्ववादी संघटना काही वर्षांपासून करत आहेत. यंदाही त्यांनी ही मोहीम सुरु केली असून सोशल मीडियासह विविध माध्यमातून जागृती केली जात आहे. तसेच व्हॅलेंटाईन डे न साजरा करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे, प्रेमीयुगुलांनी सावधगिरी बाळगून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी सुरु केली आहे. 

प्रेमभावना व्यक्त करणारा हा दिवस आहे. हा दिवस कुणीही साजरा करू शकते. हा दिवस साजरा केल्याने हिंदू संस्कृतीचे नुकसान होत नाही व होणारही नाही. आपण ग्लोबल होत चाललो आहोत. त्यामुळे, आपल्याला पटणाऱ्या संकल्पना स्वीकारण्यास काहीच हरकत नाही.
- सुशांत चव्हाण, विद्यार्थी

हिंदू युवक व युवतींनी भारतीय संस्कृती आचरणात आणावी. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचे पालन करावे. पाश्‍चात्य संस्कृतीचे कोणतेही डे साजरे करू नयेत. आपले संस्कार विसरता कामा नये.
- रमाकांत कोंडुसकर, संस्थापक, श्रीराम सेना हिंदुस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT