पश्चिम महाराष्ट्र

केंद्राची स्मार्ट सिटी योजना फसवी

सकाळवृत्तसेवा

सांगली - केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी आहे. यामुळे काही ठरािवक भागांचाच विकास होतो, असा आरोप राष्ट्रवादी अर्बन सेलच्या खासदार वंदना चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी सन २०५० चा वेध घेऊन शहरी विकासाच्या आराखड्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरी भागाच्या विकासासाठी स्वतंत्र शहर समिती स्थापन केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  

राष्ट्रवादी अर्बनतर्फे जिल्हास्तरीय सुसंवाद मेळावाही झाला. त्यातही खासदार चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी शहरातील व्यापारी, उद्योजकांशीही संवाद साधला. खासदार चव्हाण यांनी भाजप सरकारच्या स्मार्ट योजनेवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या,‘‘योजनेत संपूर्ण शहराचा समतोल विकास न होता विकास थांबतो  हे पुणे, पिंपरी चिंचवड येथे मी अनुभले आहे. ही योजना म्हणजे एक निवडणुकी जुमलाच आहे. भविष्यात तुमच्या शहराचा यामध्ये समावेशाचा प्रस्ताव आलाच तर स्पष्ट शब्दात नाकारा.’’

त्या म्हणाल्या,‘‘आगामी काळात शहरी लोकसंख्या आणखी वाढणार आहे. शहरी जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष  देणे आवश्‍यक आहे. सत्ता असो किंवा नसो लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावरून आंदोलने केली पाहिजेत. लोकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका ही नेहमीच ठोकण्याची असली पाहिजे. लोकांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवला पाहिजे. आंदोलनानेच आपली ओळख निर्माण होईल. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील सत्ता आपल्या पक्षाकडे असताना शहरे विकसित झाली. सांगलीतील महावीर गार्डन हे देखील आपल्याच सत्ता काळात निर्माण झालेले एक उत्तम उदाहरण आहे.’’  सेलचे सरचिटणीस सुरेश पाटील यांनी सेलची माहिती दिली. जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा छाया पाटील, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी मेळाव्यात मनोगत व्यक्त केले. 

शहराध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, अविनाश पाटील, क्रांतीचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, हणमंत देशमुख, ताजुद्दीन तांबोळी, विजयबापू पाटील, बाळासाहेब होनमोरे, दादासाहेब पाटील, श्रीनिवास  पाटील, पद्माकर जगदाळे, मैनुद्दीन बागवान, स्नेहल  माळी, सागर घोडके उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT