Varadi was overwhelmed with special honors ... 
पश्चिम महाराष्ट्र

आगळ्यावेगळया सन्मानाने व्हराडी भारावले...

अनिलदत्त डोंगरे

खानापूर : लष्करी सेवेत असणाऱ्या जवानाच्या विवाह सोहळ्यात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. आगळ्यावेगळया सन्मानाने उपस्थित व्हराडी भारावले. पळशी (ता. खानापूर) येथील माजी सैनिक संभाजी आणि शिवाजी यांनी आपली पुतणी व रामदास पवार यांनी मुलगी ऋतिका हिचा विवाह सैन्यात असणाऱ्या आकाश जाधव या तरुणाशी करून दिला. 

भारत मातेच्या सेवेत गेली 50 वर्षे सेवेत असणारे पवार व जाधव कुटुंब पळशी येथे राहतात. देश सेवेचे व्रत सांभाळणाऱ्या दोन्हीही कुटूंबानी विवाह सोहळा स्मरणीय केला. वधू ऋतिका ही पदवीधर आहे. तर आकाश हा जम्मू काश्‍मीर येथे भारतीय सैन्य दलात आहे. त्याने सहा वर्षे सैन्य दलात सेवा बजावली आहे. पवार कुटुंबाने आपल्या घरातील पदवीधर मुलगी ऋतिका हिची लग्न गाठ सैन्यात असणाऱ्या आपल्या गावातीलच आकाश या तरुणाशी बांधली. 

वधू ऋतिका हिचे चुलत आजोबा,दोन चुलते माजी सैनिक आहेत. तर सध्या दोन चुलत भाऊ भारत मातेच्या रक्षणासाठी लष्करात सीमेवर कार्यरत आहेत. तर वर आकाश जाधव याचे वडीलांसह तीन चुलत आजोबांनी लष्करात सेवा बजावली आहे. दोन्हीही कुटूंबाने आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात सैन्य दलातील माजी सैनिकांना सन्मानित केले. अनेकदा लग्न समारंभात मान-पान, आहेर केला जातो. यावरून रुसवा-फुगवा असतो. बुधवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात अक्षता पडण्यापूर्वी झालेल्या सन्मानाने माजी सैनिकांसह उपस्थित भारावून गेले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT