पश्चिम महाराष्ट्र

नगरप्रदक्षिणेने कोल्हापूर विठ्ठलमय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - "निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...' अशा अखंड गजरात आज उत्साहात नगरप्रदक्षिणा सोहळा झाला. पावसाची संततधार असूनही टाळ, मृदंग आणि विठ्ठलनामाच्या गजरात वारकरी तल्लीन झाले. श्री ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ, जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाने आयोजन केले. 

दरम्यान, उद्या (ता. 12) सकाळी आठला नंदवाळ - प्रतिपंढरपूर पायी दिंडी सोहळा होईल. खंडोबा तालीम येथे उभे, तर पुईखडी येथे गोल रिंगण होणार आहे. यंदाच्या या प्रतिपंढरपूर वारीत शंभरहून अधिक गावांतील वारकरी सहभागी झाले आहेत. 

मिरजकर तिकटी येथून विठ्ठल मंदिरातून देवस्थान समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर, आनंदराव लाड महाराज, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, सुजीत चव्हाण, सुरेश जरग, किशोर घाटगे यांच्यासह भक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महापौर माधवी गवंडी, प्रेरणा कट्टे यांनीही सोहळ्याला उपस्थिती लावली.

श्री विठ्ठल मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, जोतिबा रोडमार्गे भवानी मंडपात आल्यानंतर "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' असा जयघोष करीत वारकऱ्यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर पालखी मिरजकर तिकटीमार्गे टिंबर मार्केट परिसरातील सासने इस्टेटकडे मार्गस्थ झाली. 

एकादशीसाठी बाजारपेठ सज्ज 
आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली आहे. उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे. शहरातील मिरजकर तिकटीसह भाविक विठोबा (उत्तरेश्‍वर), विठ्ठल मंदिर (बुरुड गल्ली), अंबाबाई मंदिरातील विठ्ठल मंदिर, शनिवार मंडप, उत्तरेश्‍वर चौक विठ्ठल मंदिर, कैलासगडची स्वारी मंदिर आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी अभिषेक, दुपारी पालखी सोहळा आणि रात्री भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT