Vegetable Prices esakal
पश्चिम महाराष्ट्र

Vegetable Rate : भाज्यांचे दर वाढले; कांदा 50 ते 60, बटाटा 40 तर लसूण तब्बल 400 रुपये किलो, टोमॅटोही महागला

Vegetable Prices : कोथिंबिरीचे दर मागील आठवड्यात घसरले असून, पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवरात्रीच्या दिवसांत फळांची मागणी वाढली असून फळे घेण्यासाठी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

सांगली : नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत. या नऊ दिवसांत अनेक कुटुंबांत प्रामुख्याने शाकाहारास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबीचे दर वाढले आहेत. गेल्या महिन्यापेक्षा टोमॅटोच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली असून सध्या किलोचा दर १०० रुपये आहे.

कोथिंबिरीचे दर मागील आठवड्यात घसरले असून, पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर भुईमूग, ओल्या शेंगांची मागणी वाढली आहे. भाज्यांचे किलोप्रमाणे दर (रुपयांत) पुढीलप्रमाणे ः कांदा ५० ते ६०, बटाटा ४०, लसूण ४००, आले १००, भेंडी ६०, घेवडा ४०, हिरवी मिरची ८०, काकडी १००, वांगी १००, दोडका ८०, पावटा ७०, फ्लॉवर १००, भुईमूग शेंगा ९०, कारली ४०, टोमॅटो १००, सिमला मिरची ६० ते ७०, बिन्स १००, गाजर ६०, गवार ५०, रताळी ८०, दुधी भोपळा १० प्रति नग, कोबी ४०, लिंबू २० रुपयांना दोन नग, पालेभाज्यांचे दर मेथी ३० रुपये पेंडी, पालक ३० रुपये असून, कोथिंबीर १० रुपये दराने विकली जात आहे.

नवरात्रीत नऊ दिवस उपवास केला जातो. अनेक भाविकांकडून या कालावधीत फक्त फळांचे सेवन केले जाते. नवरात्रीच्या दिवसांत फळांची मागणी वाढली असून फळे घेण्यासाठी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. सीताफळ, सफरचंद, पेरू, केळी आणि संत्री या फळांना अधिक मागणी आहे. फळांचे किलोप्रमाणे दर (रुपयांत) पुढीलप्रमाणे ः संत्री लहान ३००, मोठी २००, सीताफळ १००, मोसंबी १००, डाळिंब १२०, ड्रॅगन फ्रूट १६०, पेरू ८० ते १००, सफरचंद १२०, पेर १००, केळी ६० रुपये डझन, पपई २० प्रती १ नग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT