Pandurang Kumbhar sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : उसन्या पैशांचे कारण ठरले जीवघेणे; भाजीविक्रेत्याला भोसकले

सांगली शहरासह जिल्ह्यात खून, खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोड्यासह गुन्ह्यांची गेल्या महिनाभरापासून मालिका सुरूच आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - सांगली शहरासह जिल्ह्यात खून, खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोड्यासह गुन्ह्यांची गेल्या महिनाभरापासून मालिका सुरूच आहे. सोमवारी (ता. १९) मध्यरात्री मिरज तालुक्यातील दोन ठिकाणी खुनाच्या घटना घडल्या. मिरज पूर्व भागातील बेडग येथे पूर्ववैमनस्यातून चुलत भावाचा खून झाला; तर पश्‍चिम भागातील कसबे डिग्रज येथे भाजीविक्रेत्याला भोसकण्यात आले.

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील भाजीविक्रेत्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. पांडुरंग रघुनाथ कुंभार (वय ३२, रा. मारुती मंदिराजवळ, कसबे डिग्रज) असे मृताचे नाव आहे. मित्राने उसने घेतलेले दोन हजार रुपये परत मागितल्याने काल (ता. १९) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडल्याने गावात खळबळ उडाली. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने संशयितास हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथून चार तासांत जेरबंद केले. श्रीधर ऊर्फ चेंग्या जगन्नाथ जाधव (कसबे डिग्रज) असे त्याचे नाव आहे. मृत पांडुरंग कुंभार यांचे भाऊ बालमुकुंद कुंभार यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी माहिती दिली, की पांडुरंग कुंभार हे कसबे डिग्रज येथील मारुती मंदिराजवळ कुटुंबासह राहत होते. त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. संशयित श्रीधर जाधव हा कुंभार यांचा मित्र. तो एका फौंड्रीत कामगार म्हणून काम करतो. कुंभार यांनी त्याला काही दिवसांपूर्वी दोन हजार रुपये उसने दिले होते. काल रात्री अकरा ते सव्वाअकराच्या सुमारास दोघे गावातील हॉटेल शिलेदार येथे भेटले. कुंभार यांनी उसन्या पैशांची मागणी केली. त्याचा जाधवला राग आला. दोघांत बाचाबाची झाली. वाद टोकाला गेल्यावर जाधवने कुंभार यांच्या पोटात चाकूने वार केला. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, संशयित श्रीधर जाधवने घटनेनंतर पळ काढला. ग्रामीण पोलिसांनी पथके रवाना केली. त्यांना संशयित हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे असल्याची माहिती मिळाली. तातडीने पहाटे चारच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संतोष माने, मेघराज रूपनर, सुनील कदम, विष्णू काळे, तानाजी वंजारी, बंडू पवार, मनीषा कोरे यांनी कारवाईत भाग घेतला होता.

क्षुल्लक कारण अन् राग अनावर

मृत कुंभार यांच्याकडून संशयित जाधवने दोन हजार रुपये उसने घेतले होते. काल रात्री पैशांची मागणी केल्याने त्याचा राग अनावर झाला. त्यातून त्याने चाकूने हल्ला केला. दोन हजारांचे क्षुल्लक कारण जीवघेणे ठरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT