पश्चिम महाराष्ट्र

आरटीओकडून वाहनांवर कारवाई 

सकाळन्यूजनेटवर्क

नगर ः उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांनी काल (शनिवारी) नगर व शेवगावमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांविरोधात कारवाई मोहिम उघडली होती. यामध्ये एकूण 128 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. 

ट्रीपल सीट, अवैध वाहतुकीस दंड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेवगाव व नगरमध्ये कारवाई केली. यामध्ये ट्रीपल सिट, टॅक्‍स न भरणे, अवैध प्रवासी वाहतूक, मोबाईल बोलताना वाहन चालविणे, योग्यता प्रमाणपत्र संपलेली वाहने, अतिरिक्त विद्यार्थ्यांची स्कूलबसमध्ये वाहतूक करणे, रुग्णवाहिकेंवर दरपत्रक नसणे, सीटबेल्ट, सिग्नल तोडणे आदी प्रकारांमध्ये 128 जण आढळून आलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सुमारे 66 हजाराचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. 128 पैकी एकूण 12 वाहने अडकावून ठेवण्यात आलेली आहेत. या मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


अशी झाली कारवाई 
हेल्मेट नसणे ः 49, ट्रिपलसीट ः 36, सिग्नल तोडणे ः पाच, मोबाईलवर बोलणे ः 28, अवैध प्रवाशी वाहूतक ः नऊ, सीटबेल्ट ः चार, विमा हप्ता मुदतीत न भरणे ः 22, दरपत्रक नसलेल्या रुग्णवाहिका ः दोन, स्कूल बस ः पाच, योग्यता प्रमाणपत्र संपलेले वाहने ः सात, अवाढव्य मालाची वाहतूक करणारी वाहने ः तीन, टॅक्‍स न भरलेले जेसीबी ः तीन, टॅक्‍स न भरलेले 12 वाहने. 

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या कारवाई मोहिमेच्या आज पहिल्या दिवशी एकूण 128 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यापुढेही अशीच कारवाई मोहिम सुरु राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.

रुग्णवाहिका रडारावर 
रुग्णवाहिकांना सरकारकडून दरपत्रक ठरवून देण्यात आलेले आहे. ते दरपत्रक रुग्णवाहिकेवर आतील व बाहेरील बाजूने लावलेले असणे गरजेचे आहे. अनेक वाहनांवर दरपत्रक दिसून येत नाही. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा रुग्णवाहिकांवर कारवाईची मोहिम राबविण्यात येणार आहे. 

प्रमाणापेक्षा होतेय शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक 
शालेय विद्यार्थ्यांना शाळेत नेण्या व आणण्यासाठी शाळा व काही खासगी लोकांनी स्कूलबसची सुविधा सुरु केलेली आहे. या बसला विद्यार्थी वाहून नेण्याची क्षमता ठरवून दिलेली आहे. मात्र प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. ही बाबत आता पुढे आलेली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने आज केलेल्या कारवाई मोहिमेत एकूण पाच स्कूलबसवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. 

यांनी केली कारवाई 
मोटारवाहन निरीक्षक सलिम मुन्शी, अरविंद फुलारी, विलास कांडेकर व सहायक वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे, हनुमंत पारधी, रुपाली खर्से, राहुल सरोदे, राकेश जगताप, अमृता वांढेकर, प्रियंका निर्वाण, सोनाली शिरसाठ, माधुरी पाटील, प्रियंका क्षेत्रे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT