Vertical split in the elementary teacher team just before the end of the year 
पश्चिम महाराष्ट्र

वर्ष पूर्ण होण्याआधीच प्राथमिक शिक्षक संघात उभी फूट 

अजित झळके

सांगली : माजी आमदार शिवाजीराव तथा शि. द. पाटील यांच्या निधनाला अजून एक वर्ष पूर्ण होण्याआधी प्राथमिक शिक्षक संघात उभी फूट पडली आहे. शि. द. यांचे चिरंजीव तथा अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या विरोधात त्यांचे पुतणे तथा शि. द. यांचे नातू धैर्यशील पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यांनी दहापैकी आठ तालुकाध्यक्षांची तातडीची बैठक घेऊन आज जिल्हा कार्यकारिणी आणि पार्लमेंटरी बोर्ड बरखास्तीची घोषणा करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. 

कालच माधवरावांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्हा सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या अमोल माने यांना नवीन अध्यक्ष जाहीर करण्यात आले. दोनवेळा विधान परिषद आमदार राहिलेल्या शि. द. पाटील यांच्या शिक्षक संघाचे नेतृत्व कुणाकडे असेल, यावरून आता वारस संघर्ष सुरू झाला आहे. प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या तोंडावर असलेल्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धक्कादायक घडामोडी सुरू आहेत. त्यात आज नाट्यमय वळण आले. 

गेल्या आठवड्यात येलूर येथे संघाची बैठक झाली होती. त्यात तालुकाध्यक्षांनी शि. द. यांचे नातू धैर्यशील यांनी संघाचे नेतृत्व हाती घ्यावे, अशी मागणी केली होती. त्याचवेळी माधवराव समर्थक व जिल्हाध्यक्ष मुकुंदराव सूर्यवंशी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्या दिवसापासून संघात वातावरण ढवळून निघाले होते. या साऱ्या घडामोडींना कुपवाड येथील शिक्षक व जिल्हा सरचिटणीस अमोल माने हेच कारणीभूत आहेत, असा आरोप करत काल माधवराव पाटील व मुकुंदराव सूर्यवंशी यांनी त्यांची पदावरून हकालपट्टी केली होती. त्याच माने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालून धैर्यशील यांनी काकांना उघड आव्हान देताना शि. द. गटाचा वारस म्हणून आपला दावा पुढे केला आहे. 

या बैठकीला तालुकाध्यक्ष संजय खरात, भीमराव पवार, नंदकुमार कुट्टे, धनाजी साळुंखे, यशवंत गोडसे, बाळू गायकवाड, प्रताप गायकवाड, विजय साळुंखे उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीत राहुल पाटणे सरचिटणीस, दिलीप खोत जिल्हा कार्याध्यक्ष, मारुती देवडकर जिल्हा कोषाध्यक्ष, विलास कदम जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे धैर्यशील पाटील यांनी जाहीर केले. 

माझे काका माधवराव पाटील हेच आमचे नेते आहेत. त्यांना कल्पना देऊनच मी सर्व निर्णय घेत आहे. त्यामुळे आमच्यात फूट पडणार नाही, असा मला विश्‍वास आहे. चुकीच्या गोष्टी संघात चालू देणार नाही. जे चांगले आहे, त्यालाच सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ.
- धैर्यशील पाटील, शि. द. यांचे नातू 

शिक्षक संघाच्या घटनेनुसार धैर्यशील पाटील यांना किंवा तालुकाध्यक्षांना कार्यकारिणी बरखास्तीचा अधिकार नाही. पहिली कार्यकारिणी कायम राहील. अमोल माने यांनी संघटनेविरुद्ध कारवाया केल्याने त्यांना काढून टाकले आहे. त्यामुळे चिडून ही उठाठेव केली आहे. शिक्षक संघाचा उद्देश बॅंक निवडणूक एवढाच नाही. तो आधी समजून घ्यावा. दडपशाही चालू देणार नाही.
- माधवराव पाटील, महासंघाचे अध्यक्ष

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT