Anant Gadgil
Anant Gadgil 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : ...याचसाठी भाजपकडून नियमितपणे नवनवीन इव्हेंट; गाडगीळांची टीका

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कलम 370 रद्द करण्याचा निर्णय असो की राफेल विमान खरेदीचा, या सर्वाचा भाजपने इव्हेंट केला आहे. देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे नियमितपणे नवनवीन इव्हेंट करत आहे. त्यामुळे भाजप ही एक इव्हेंट कंपनी झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्‍ते अनंत गाडगीळ यांनी केला. काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी काँग्रेस कमिटीकडून करवीर मतदारसंघासाठी नेमलेल्या निरीक्षक माळी, गुलाबराव घोरपडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भूपाल शेटे, दीपा पाटील, संजय वाईकर उपस्थित होते. 

गाडगीळ म्हणाले, ""2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामध्ये सर्वात मोठा आरोप होता तो टू जी स्पेक्‍ट्रमचा. हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्पेक्‍ट्रमचा लिलाव केला. लिलावात 8 हजार कोटींचे उत्पन्न मिळाले. काँग्रेस मुख्यमंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले होते, मात्र राज्यातील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सिडकोच्या खारघर येथील 24 एकर जागेसंबंधी 1760 कोटींचा आरोप झाला. तसेच पंकजा मुंडे, दीपक सावंत, विनोद तावडे, विष्णू सावरा, दिवाकर रावते, जयकुमार रावल, संभाजी निलेंगकर, गिरीश बापट, सुभाष देसाई आदींवर आरोप झाले, मात्र एकानेही राजीनामा दिला नाही. उलट महाराष्ट्राच्या इतिहासातील हे पहिले सरकार आहे, जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असे वक्‍तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी करुन मोठा विनोद केला.'' 

गाडगीळ म्हणाले, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नोटबंदीचा निर्णय फसला आहे. नोटबंदी करुन ना काळा पैसा आला ना दशहतवाद थांबला. उलट दहशतवादाच वाढच झाल्याचे अहवालातून दिसून येत आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात जीडीपी 8 टक्‍के होता. तो 5 टक्‍केवर घसरला आहे. लाजीरवाणी बाब म्हणजे भूतान, नेपाळ, बांगलादेशचाही जीडीपी साडेसात टक्‍केवर असल्याचे सांगत सरकारच्या आर्थिक नीतीचे त्यांनी वाभाडे काढत महाराष्ट्राच्या दिवाळखोरी यावर त्यांनी चौफेर टीका केली. 

भाजपची डिक्‍शनरी 
भाजपकडे केवळ पाच अक्षरांची इंग्लिश डिक्‍शनरी आहेत. यामध्ये ई, डी, सी. बी.आय. एवढीच अक्षरे आहेत. त्यावरच कारभार सुरू आहे. विरोध करणाऱ्यांना या अक्षरांची, संस्थांची भीती दाखवली जात आहे, मात्र यावेळी परिवर्तन अटळ असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT