Vidhan Sabha 2019 cm devendra fadnavis solapur mangalwedha rally speech
Vidhan Sabha 2019 cm devendra fadnavis solapur mangalwedha rally speech 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : ताज महलसोडून सगळं देऊ; विरोधकांची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नुकताच विधानसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांनी आघाडीची खिल्ली उडवली आहे. राज्यात विरोधक आहेत कुठं? असा प्रश्न त्यांनी सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभेत उपस्थित केलाय.  मंगळवेढा येथे महायुतीच्या उमेदवारीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांचे प्रचारार्थ ते बोलत होते.

विरोधक म्हणजे, ‘खोटं बोल पण रेटून बोल’
मुख्यमंत्री फडणवीस (cm devendra fadnavis) म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीने नुकताच त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यांना माहिती आहे की, या निवडणुकीत त्यांना विजय मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी जाहीरनाम्यात तोंडाला येईल ती आश्वासने दिली आहेत. त्यांना जाहीरनामा पाहिला की, वाटतं फक्त ताज महलसोडून सगळी आश्वासनं त्यांनी दिली आहेत. खोटं बोल पण रेटून बोल, असा त्यांचा प्रकार आहे.' काँग्रेस-राष्ट्रवादीचा पंधरा वर्षांतील कारभार महाराष्ट्राच्या जनतेने पाहिला आहे आणि गेल्या पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखालील केंद्र सरकारचा कारभार जनतेने पाहिला आहे. आता भाजप, शिवसेना, रासप, शिवसंग्राम, रिपाई यांच्या माध्यमातून राज्यात खूप मोठी ताकद उभी राहिली आहे, असे मतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

दुष्काळमुक्तीसाठी महायुतीला मत द्या
फडणवीस (cm devendra fadnavis) म्हणाले, 'सुशीलकुमार शिंदे दृष्ट्ये नेते आहेत. त्यांना माहीत आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते पद मिळावं एवढेही आमदार दोन्ही पक्षांचे निवडून येणार नाहीत, हे सुशीलकुमार शिंदे यांना माहिती आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये विलीन करावी लागणार आहे. त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांनी असे वक्तव्य केले आहे. मुळात राज्यात विरोधी पक्ष कोठे शिल्लक राहिला आहे? एकीकडे सांगली कोल्हापूर येथे महापूर आहे. तर, दुसरीकडे मंगळवेढा सांगोला येथे थेंबभर पाणी नाही .ही दरी मिटवण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून कॅनलच्या साह्याने पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नीर-भीमा योजना ही लवकरच पूर्ण होईल.' महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी  महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी मतदारांना घातली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT