Prabhakar Gharge on Vaduj city
Prabhakar Gharge on Vaduj city  
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019: अहंकारी वृत्तीचा निवडणुकीत बिमोड होईल : प्रभाकर घार्गे

वृत्तसंस्था

दहिवडी : भूलथापात माहीर असणार्यांनी वडूजला स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून मते घेतली. सामान्य जनतेला कस्पटासमान समजणार्या अहंकारी वृत्तीचा यावेळी बिमोड होणार असून ही निवडणूक त्यांची गुर्मी उतरवणारी ठरणार आहे असा इशारा माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी विरोधकांना दिला.

वडूज येथे माण मतदारसंघातील 'आमचं ठरलंय'चे अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, दादासाहेब गोडसे, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, प्रा. अर्जुनराव खाडे, हिंदूराव गोडसे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, तानाजी बागल, डॉ. विवेक देशमुख, विजय काळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार घार्गे म्हणाले,'अपप्रवृत्तीचा आळाबांधा करण्यात हुतात्म्यांची भूमी असलेला खटाव तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी एकच विचार व एकच दिशा निश्चित करु व 'टेबल' चिन्हावर भरघोस मतदान करु. कारण सध्याची निवडणूक ही आपल्यासाठी युध्दासारखी असून आपल्याला हे युद्ध जिंकायचेच आहे'.

प्रभाकर देशमुख म्हणाले,'माण-खटावचा चेहरामोहरा बदलणारी, सन्मानाची व स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. मतदारसंघात परिवर्तन अटळ असून वाईट प्रवृत्ती गाडल्या जाणार आहेत. विरोधकांच्या साम, दाम, दंड भेद या सर्व आयुधांना जशास तसे उत्तर दिले जाणार आहे'.

या वेळी माजी सरपंच अर्जुन गोडसे, किसनराव गोडसे, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, सोमनाथ येवले, प्रताप काटकर, दिलीप मांडवे, तुषार सानप, लिलाधर पवार, अजय फडतरे, संगीता पवार, जावेद मणोरे, तुकाराम देवकर, अशोक बैले, आनंदा खुडे, अक्षय थोरवे, वैभव फडतरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT