पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : रोजगारासाठी कोल्हापुरात आयटी हब उभारू ; अमित शहांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवले. 
या देशात दोन पंतप्रधान होऊ शकत नाही. एकच घटना पाहिजे दुसरी चालणार नाही. किती सरकारे आले गेले. पण 370 हटवण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण मोदीसारख्या 56 इंच छाती असणारया पंतप्रधानाने हे कलम 370 हटवलं. आत्ता तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना विचारा तुम्ही 370 का हटवले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. 

कोल्हापूर येथे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. शहा तब्बल दोन तास उशीराने आले पण त्यांच्या आगमनानंतर सभेत मोठा उत्साह आला. त्यांच्या आगमनानंतर नागरिकांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.  

पुरामुळे कोल्हापूर, सांगलीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल. यासाठी केंद्रसरकार चट्टाणासारखे तुमच्या मागे उभे असेल. कोल्हापूर, सांगली या शहरांच्या विकासासाठी प्रयत्न करू. कोल्हापुरातील बेरोजगारीचा प्रश्न हटविण्यासाठी येथे आयटी हब उभे करणार आहोत.

- अमित शहा

आघाडी सरकाने यांनी किती निधी दिला आणि युती सरकारच्या काळात केंद्रातून किती निधी आला. याचा हिशोब श्री. शहा यांनी त्याच्या भाषणात मांडला. 

कोल्हापुरात काँग्रेसने लावलेला टोल युती सरकारने रद्द केला.   

- चंद्रकात पाटील, महसूलमंत्री 

श्री. शहा म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत तर एअर स्ट्राईक करून दहशतवादी मारले त्यावर राहुल गांधी टीका करत आहेत. 

श्री शहा म्हणाले, 

  • कोल्हापूरच्या चप्पल उद्योगाला जिओग्राफिकल इंडिकेशन देण्याच काम भाजप सरकारने केले. 
  • मोदींनी सगळ्यात मोठं काम केले ते म्हणजे भारताला सन्मान मिळवून दिला. मोदी मोदी अशा घोषणा नरेंद्र मोदींसाठी नसतात त्या घोषणा म्हणजे देशाचा सन्मान आहे
  • कोल्हापुरात आयटी हब उभारणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT