पश्चिम महाराष्ट्र

डावीकडून उजवीकडे झुकलेल्या नागनाथ अण्णांच्या वारसदारांमध्ये फूट ?

शांताराम पाटील

इस्लामपूर - मोठ्या कष्टानं व अनेकांना ओव्हरटेक करून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळवित गौरव नायकवडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यावेळी त्यांचे चुलते वैभव नायकवडी यांनी  दांडी मारली. यामुळे डावीकडून उजवीकडे झुकलेल्या नागनाथ अण्णांच्या वारसदारांमध्ये फूट पडल्याचीच चर्चा सर्वत्र रंगली होती. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राहूल महाडिक, वैभव शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, भीमराव माने, नगरसेवक विक्रम पाटील यांच्या उपस्थितीत आज गौरव नायकवडी यांनी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यासाठी वैभव नायकवडी येणार का? अशी चर्चा सभेपुर्वी सुरू होती, त्याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र सभेचा समारोप झाला तरीही ते सभेच्या ठिकाणी फिरकले नाहीत. यावरून वैभव यांचा गौरव यांच्या उमेदवारीला पाठिंबा की विरोध? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. गौरव हे शिवसेनेतून उभारणे हा वाळवा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला धक्का होता. त्यांच्या सेनेतील प्रवेशानंतर वैभव नायकवडी हे गौरव यांची पाठराखण करणार का? याबाबत उत्सुकता होती, मात्र वैभव नायकवडी यांनी या सभेला अनुपस्थिती दाखवून द्यायचा तो संदेश दिला, असे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये जाणार? BJP आणि NCP च्या दोन बड्या नेत्यांमध्ये भेट; नव्या समीकरणांची चर्चा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची टीम आली अन् स्वीट होममध्ये आढळला मृत उंदीर; तात्काळ परवाना रद्द, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

CM Vijay: तमिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय! दारू विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांदी; मात्र दारूप्रेमींना बसणार मोठा झटका?

Pandharpur Wari 2026 Schedule: पाऊले चालती पंढरीची वाट...रिंगण कधी? मुक्काम कुठे? पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! ९९ वर्षांच्या लीज जमिनींचा गुंता सुटणार; महायुती सरकारने महत्त्वाचे नियम बदलले

SCROLL FOR NEXT