BJP-Shivsena
BJP-Shivsena 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : भाजपमधील इच्छुकांची गोची!

प्रवीण जाधव

जिल्ह्यात विधानसभेसाठी युतीचा जागावाटप फॉर्म्युला अंतिम टप्प्यात; तीन जागा मिळण्याची शक्‍यता
सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेमध्ये विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठपैकी दोन विधानसभा मतदारसंघांत भाजप, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष व अन्य पाच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार राहणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतदारसंघांत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या भाजप इच्छुकांची अडचण होण्याची शक्‍यता आहे. पक्षनेतृत्व यावर कसा मार्ग काढणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

सातारा जिल्हा म्हटले की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच वर्चस्व आजवर राहिले आहे. त्यामुळे निवडणुकांत अन्य पक्षांना उमेदवार शोधायची वेळ यायची. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील हे चित्र बदलण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केले. अगदी तळागाळापर्यंत पक्षाचे ‘नेटवर्क’ तयार केले. शतप्रतिशत भाजप या घोषणेची पूर्तता करण्यासाठी हे झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीत पक्षात गरज भासू शकते. या शक्‍यतेमधून राज्यामध्ये शिवसेनेला डावलण्याचा निर्णय थांबला. दोन्ही पक्षांमध्ये युती झाली. त्याचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकांमध्ये दिसून आला. परंतु, त्यामुळे राज्यातील भाजपच्या वाढीवर मर्यादा नक्कीच आल्याचे चित्र दिसत आहे. 

स्वबळाच्या तयारीमुळे भाजपने प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला. त्या उमेदवारांना विविध मार्गाने ताकद दिली. परंतु, आता त्यांचे आमदारकीला उभे राहण्याचे स्वप्न कसे पूर्ण करायचे, असा गहन प्रश्‍न पक्षनेतृत्वापुढे उभा राहिला आहे. 

सातारा लोकसभेमध्ये विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. भाजपने गेल्या साडेचार वर्षांत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या आठही मतदारसंघांत भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत. परंतु, जागावाटपाच्या प्राथमिक बोलण्यांमध्ये भाजपकडे केवळ दोन मतदारसंघच येणार असल्याची शक्‍यता आहे. त्यात कऱ्हाड दक्षिण व सातारा मतदारसंघाचा समावेश आहे.

त्याचबरोबर माण मतदारसंघ हा भाजपच्या कोट्यातून मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडवा लागण्याची शक्‍यता आहे. त्यातही रासपच्या नेतृत्वाचे मन वळवण्यात यश आल्यास तेथून भाजपचा उमेदवार उभा केला जावू शकतो. अन्य पाच म्हणजे पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, वाई व फलटण या मतदारसंघांवर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे तेथून सेनेचेच उमेदवार उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. या पाच मतदारसंघांपैकी कऱ्हाड उत्तर, कोरेगाव व वाई या ठिकाणी अनुक्रमे मनोज घोरपडे, महेश शिंदे व मदन भोसले असे चांगले पर्याय भाजपकडे आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडे तसे सक्षम उमेदवार या ठिकाणी नाहीत. घोरपडे व शिंदे आधीपासूनच मतदारसंघांत कामाला लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT