पश्चिम महाराष्ट्र

वडणगेतील सागरी बगळ्याचे दर्शन 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : बर्डस्‌ ऑफ कोल्हापूर या फेसबुक ग्रुपतर्फे पाचव्या टप्प्यातील पक्षिगणना आज झाली. यात वडणगे गावातील शिवपार्वती तलावावर या पक्षिप्रेमी ग्रुपने पक्ष्यांचे निरीक्षण नोंदवले. यात 62 प्रजातींचे 366 पक्षी नोंदवले गेले. त्यातील 14 स्थलांतरित, एक क्वचित स्थानिक स्थलांतरित व चार स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होता. 

शिवपार्वती तलाव तसा छोटा; पण पक्ष्यांचा वावर असलेला. यात सागरी बगळा हा विशेष नोंदवला गेलेला पक्षी. हा समुद्रकिनाऱ्याला मिळणारा पक्षी आहे आणि क्वचितच समुद्रापासून लांब स्थलांतरित होताना पाहिला गेला आहे. याबरोबरच काणुक, शराटी, काळ्या डोक्‍याचा शराटी, दलदल हरीण, तपकिरी खाटिक, लालबुडी भिंगरी, पिवळा धोबी, कास्य पंखी कमळपक्षी आणि त्याची पिले, दंगेखोर बोरू वटवट्या, टिंबळा हे काही विशेष पक्षीही आढळून आले. या पक्षिगणनेत आशिष कांबळे, स्वप्नील पवार, दिलीप पाटील, मोहन धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. प्रणव देसाई, सतपाल गंगलमाले यांनी संयोजन केले. 

प्लास्टिक, कचऱ्याचे साम्राज्य 
वडणगे येथील शिवपार्वती तलाव हा जैवविविधतापूर्ण आहे; मात्र तलावाच्या परिसरात प्लास्टिक व कचऱ्याचे साम्राज्य आहे. तसेच या तलावात पाळीव जनावरेही धुतली जातात. त्यामुळे तलावाच्या जैवविविधतेला धोका पोहचू शकतो, अशी शक्‍यता पक्षिप्रेमींनी व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT