पश्चिम महाराष्ट्र

जागृत दक्षता समितीमुळे या गावावरचे  संकट टळले

सकाळवृत्तसेवा

ढालगाव : घोरपडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली ) येथील दक्षता समितीच्या जागृतीमुळे गावांत कोरोनाचा रुग्ण येऊ शकला नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. 

घोरपडी येथील एकजण मुंबई येथील मानखुर्द भागात ट्रकचालक होता. तो पत्नी व मुलांसह मानखुर्द येथेच स्थायिक आहे. "कोरोना' चे थैमान सुरू असल्याने राज्यात जिल्हा बंदी सुरू आहे. कोणालाही जिल्हा बदलून परवानगीशिवाय येता येत नाही. मात्र घोरपडी येथील एक व्यक्‍ती मानखुर्दमधून सोमवारी गावी येण्यास निघाला. त्याने गावी भावाला फोन केला. मी गावी येत आहे. भावाने सांगितले "तू निघाला नसला तर तेथेच रहा. गावात घेत नाहीत. गुन्हा दाखल करतात.' मात्र त्या व्यक्तीने सांगितले,

"मी इस्लामपूरमधून टॅंकरमधून चोरोची येथे येत आहे.' भावाने ही माहिती दक्षता समितीचे सरपंच वनिता सरगर, तलाठी प्रमोद साठे, पोलिस पाटील कविता नरळे, ग्रामसेविका एस. एन. मस्के, आरोग्य सेविका सुवर्णा बागल, अंगणवाडी सेविका व इतर सदस्यांना दिली. त्यामुळे त्याला दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र त्याच्याकडे गाडी नसल्याने मुेहण्याला बोलाऊन घेऊन ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश कोळेकर यांनी तत्परता दाखवली. मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यामुळे गावात होणारा प्रसार वेळीच रोखला गेला. 

दुधेभावीत जी चुक झाली ती चुक घोरपडीतील दक्षता समितीने केली नाही. 
मानखुर्ध मधील व्यक्ती चार महिन्याभरापुर्वी गावी येऊन गेली आहे. त्याचे कुटुंब बेवनूर (जत) येथून 26 एप्रिलला घोरपडी येथे येऊन राहिले. त्यामुळे घोरपडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ज्याप्रमाणे घोरपडीतील लोकांनी तत्परता दाखवली. वेळीच दक्षता समितीला माहिती दिली. घोरपडी गावारील संकट टळले. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील इतर गावांतील नातेवाईकांनी व दक्षता समितीने खबरदारी घ्यावी. "कोरोना' चा गावांत शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: महावीर जयंतीला बँका सुरू राहणार की नाही? बँका सलग दोन दिवस बंद? RBI काय सांगते

"चालू सीनमध्ये आमच्या नाटकाचं पोस्टर दिसत होतं" प्रियाने सांगितली नव्या वेबसीरिजच्या मेकिंगची आठवण

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांचा मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा

Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

Junnar Crop Damage: जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस व लिंबाएवढ्या गारांचा कहर; द्राक्ष, कांदा, टोमॅटो, आंबा पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT