mohol
mohol 
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळ : विजयराज डोंगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळवृत्तसेवा

मोहोळ : विजयराज डोंगरे यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे मन लावून केल्याने त्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला, अद्यापही विकासकामे रखडलेली आहेत ती ही जरूर पूर्ण करू. विरोधकांना चाळीस वर्ष भरभरून दिले मात्र त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही, स्वतःचा विकास केला कुठल्याही अडचणीच्या वेळी विजयराज यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहू, त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करू, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.

जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती तथा लोकशक्ती भीमा परिवाराचे नेते विजयराज डोंगरे यांच्या भाजपा प्रवेशासाठी आयोजित केलेल्या सहविचार सभेला  पालकमंत्री मार्गदर्शन करीत होते. डोंगरे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेटफळे येथे भाजपात प्रवेश केला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते.

यावेळी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,भाजप तालुकाध्यक्ष सतीश काळे,मदन लाळे,रामदास झेंड्गे, भाऊराव पाटील,जि  प सदस्य तानाजी ख़ताळ,कॉंग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील,मोहन व्हनमाने,लोकशक्ती शुगर चे उपाध्यक्ष शिवानंद पाटील,कामतीचे सरपंच रामराव भोसले,फंटू गोफने,दिगंबर माळी,दीपक गवळी,पांडुरंग बचुटे,सौदागर खड़के,दिलीप गायकवाड़,अजय गायकवाड़,संजय तळेकर,दत्ता वागज,जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष सर्जेराव चवरे,बाबा बाबर,भीमा चे संचालक राजेन्द्र टेकळे,जयसिंग आवताड़े,डॉ बाळासाहेब सरवळे,सुनील पाटील,भाजप नेते संजय क्षीरसागर,सतीश पाटील लक्ष्मण घागरे,बाळासाहेब टेकळे,पांडुरंग डोंगरे, सुनील चव्हाण,संभाजी माने,सज्जन चवरे, हिम्मत पाटील,हरिभाऊ घुले,बुवा जगताप,सज्जन पवार,डॉ प्रतिभा व्यवहारे,समता गावडे,चंद्रकांत करंडे,विट्ठल माळी,नागराज पाटिल,लाला पाटील,डॉ अमित व्यवहारे,उमेश मेलगे,सुभाष सोलंकर, विविध गावचे सरपंच,उपसरपंच,सोसायटी अध्यक्ष,उपस्थित होते.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले ,एका दिवसात डोंगरे यांच्या फोनवर एवढे कार्यकर्ते जमत असतील तर, विरोधकांनी काय ओळखायचे ते ओळखून घ्यावे जिल्ह्यातील दोन देशमुखावर विश्वास ठेवून डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ,डोंगरे यांना कारखान्यासाठी जरूर मदत करू, तसेच  तालुक्यातील अर्धवट राहिलेली विकास कामे ही करू. जिल्हा बँक आता भाजपच्या ताब्यात आहे त्यामुळे त्यांनी निधीची काळजी करू नये.

यावेळी विजयराज डोंगरे म्हणाले ,माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी मंत्री शरद पवार यांच्याबद्दल आमच्या मनात कुठलाही रोष नाही, पवार यांच्या कानावर वेळोवेळी तालुक्याची परिस्थिती घालूनही त्यांनी अपप्रवृत्तीचा बंदोबस्त न केल्यामुळे मला भाजपात जाण्याची वेळ आली, भाजपाने जिल्ह्यात विकासाची गंगा आणली माझा भाजपा प्रवेश हा विकासासाठी आहे माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. एखाद्या आमदारा पेक्षाही ज्यादा काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी केले आहे ,त्यामुळे भविष्यातही विकास करू यावेळी संतोष पाटील ,दिपक गवळी,डॉ बाळासो सरवळे ,गणेश मुळे ,बाबा बाबर,फंटु गोफणे,समता गावडे,यांनी मनोगते व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT